भारतीय महाकाव्य महाभारत हे केवळ युद्धाचे वर्णन नाही तर धार्मिकता आणि नैतिकतेचा एक धडा देखील आहे. या महाकाव्यात धर्मराज युधिष्ठिराच्या शापाबद्दल एक घटना आहे. महाभारतात एक असा प्रसंग घडला ज्यात धर्मराज उद्दिष्टरणे आपल्या आईला म्हणजेच माता कुंतीलाच शाप दिला. युधिष्ठिरने माता कुंतीला दिलेल्या शापाचे परिणाम आजही या कलयुगात महिलांना सहन करावा लागतोय.
काय होती घटना
महाभारतानुसार, जेव्हा पांडवांनी कौरवांवर विजय मिळवला तेव्हा त्यांची आई कुंतीने एक रहस्य उघड केले ज्यामुळे युधिष्ठिरासह सर्व पांडवांना धक्का बसला. जेव्हा अर्जुनाने करण्याचा वध केला तेव्हा कुंतीने सर्वांसमोर सत्य मान्य केले. रडत कुंतीने सांगून टाकले की ज्या कर्ण विरोधात पांडव आयुष्यभर लढले तोच कर्ण प्रत्यक्षात याच पांडवांचा ज्येष्ठ बंधू होता. विवाहपूर्व स्थितीमुळे समाजात बदनामी टाळण्यासाठी, कुंतीने कर्णाचा त्याग केला होता आणि युद्ध संपेपर्यंत हे सत्य लपवून ठेवले होते.

युधिष्ठिरला राग आला
हे सत्य ऐकून युधिष्ठिर राग आला आणि वेदना सुद्धा झाल्या त्याला वाटले की जर हे सत्य वेळीच उघड झाले असते तर अशा भयानक आपत्तीला टाळता आले असते आणि त्याला स्वतःच्या भावाला मारण्याचा दोष सहन करावा लागला नसता. कुंतीने शेवटपर्यंत कर्णच्या जन्माबद्दलचे रहस्य लपवून ठेवल्याने युधिष्ठिराने कुंती आणि संपूर्ण महिला समुदायाला जबाबदार धरले.
युधिष्ठिराने काय शाप दिला
दु:ख, पश्चात्ताप आणि क्रोधाने भारावून युधिष्ठिराने त्याच्या आईसह सर्व महिलांना शाप दिला की कोणतीही महिला कधीही जास्त काळ कोणतीही गोष्ट लपवू शकणार नाही. पौराणिक मान्यतेनुसार, या शापाचे परिणाम आजही महिलांवर जाणवतात. असे मानले जाते की म्हणूनच महिला त्यांचे गुपिते जास्त काळ स्वतःमध्ये ठेवू शकत नाहीत आणि शेवटी ते कोणाला ना कोणाला याबाबत सांगतातच.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











