कान्स फेस्टिवल गाजवणारी छाया कदम पोहोचली कोकणात

Asavari Khedekar Burumbadkar

छाया कदम यांनी अत्तापर्यंत अनेक सिनेमात काम केलंय. अनेक मराठी तसंच हिंदी सिनेमा छाया यांनी गाजवले आहेत. कान्समध्ये त्यांच्या लूकपासून ते त्यांना मिळालेला स्टॅंडिंग ओवेशनने अनेकांची मने जिंकली. छाया कदम सध्या त्यांच्या कोणत्या चित्रपटांमुळे नाही तर त्यांच्या एका व्हिडीओमुळे चर्चत आल्या आहेत.

छाया कदम यांनी शेअर केला व्हिडीओ

छाया कदम सध्या कोकणात गेल्या असल्याचे त्यांच्या सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. छाया कदम यांनी सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्या फणसाची गरे खाताना दिसत आहेत. विशेष बाब म्हणजे त्या मालवणी भाषा बोलत आहेत. व्हिडीओ शेअर करताना छाया कदम यांनी ‘पहिलो गरो’ असं कॅप्शन दिल आहे. तसेच पुढे हार्ट इमोजी शेअर केली आहे. अभिनेत्री या व्हिडीओमध्ये साध्या पेहरावात दिसत आहेत.

चाहत्यांनी दिल्या कोकणातील प्रवासासाठी शुभेच्छा 

छाया कदम यांनी सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या आहेत, ज्यात त्या कोकणातील विविध ठिकाणांवर फिरताना दिसत आहेत.या पोस्टमध्ये त्यांनी कोकणातील निसर्गाचा आणि पारंपरिक खाद्यपदार्थांचा अनुभव घेतला आहे. छाया कदम यांच्या या व्हिडीओवर अनेक चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यांच्या चाहत्यांनी या पोस्टवर सकारात्मक प्रतिक्रिया दिली आहे. अनेकांनी छाया कदम यांच्या मालवणी भाषेचे अनेकांनी कौतुक केले आहे आणि त्यांना कोकणातील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

 

 

ताज्या बातम्या