Shahrukh Khan: शाहरुखच्या नावाने उभारली जाणार 4000 कोटींची गगनचुंबी इमारत

ही इमारत तब्बल 55 मजली असेल आणि तिच्या प्रवेशद्वारावर शाहरुखची एक भलीमोठी मूर्ती उभारली जाणार आहे. ही मूर्ती त्याच्या Dilwale Dulhania Le Jayenge चित्रपटातील आयकॉनिक पोजमध्ये असेल.

दुबईसारख्या जगप्रसिद्ध शहरात अनेक लोक उंच इमारतींमध्ये घर घेण्यासाठी प्रयत्न करतात, पण काहींच्या नावावरच संपूर्ण इमारत उभी राहते. बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान (Shahrukh Khan) हा या विशेष श्रेणीत मोडतो. दुबईस्थित Danube Group ने अलीकडेच एका मोठ्या घोषणेद्वारे जाहीर केले आहे की ते शाहरुखच्या नावाने एक कमर्शियल बिल्डिंग चेन तयार करणार आहेत. या प्रोजेक्टचे नाव ‘Shahrukhz’ असे असेल आणि त्यातील पहिली भव्य इमारत दुबईमध्ये उभारली जाणार आहे.

तब्बल 55 मजली इमारत

ही इमारत तब्बल 55 मजली असेल आणि तिच्या प्रवेशद्वारावर शाहरुखची एक भलीमोठी मूर्ती उभारली जाणार आहे. ही मूर्ती त्याच्या Dilwale Dulhania Le Jayenge चित्रपटातील आयकॉनिक पोजमध्ये असेल. या अनोख्या संकल्पनेमुळे ही इमारत केवळ कमर्शियल टॉवर न राहता शाहरुखचे जागतिक ब्रँड मूल्य दाखवणारी एक ऐतिहासिक ओळख निर्माण करेल.

Danube Group चे संस्थापक रिझवान साजन यांनी मुंबईतील एका खास कार्यक्रमात या प्रोजेक्टची अधिकृत घोषणा केली. त्यांच्यानुसार, हा टॉवर प्रीमियम कमर्शियल आणि लाइफस्टाइल सुविधांनी सजलेला असेल. Shahrukhz टॉवर दुबईच्या सर्वात मोठ्या बिझनेस कॉरिडॉर असलेल्या शेख झायेद रोडवर उभा राहील. कंपनीच्या अंदाजानुसार, या प्रोजेक्टला पूर्ण व्हायला सुमारे तीन ते चार वर्षे लागतील आणि वर्ष 2029 पर्यंत हा टॉवर संपूर्णपणे तयार होण्याची शक्यता आहे.

दुबईत किंग खानची लोकप्रियता जास्त

दुबईमध्ये शाहरुख खानची लोकप्रियता अफाट आहे. तो दुबई टुरिझमचा ब्रँड अॅम्बेसडर असल्याने दरवर्षी त्याच्या वाढदिवशी किंवा चित्रपट रिलीजच्या वेळी बुर्ज खलीफा टॉवरवर त्याच्या सन्मानार्थ खास लाइट शो प्रदर्शित केला जातो. आता Shahrukhz प्रोजेक्टमुळे शाहरुख हा जगातील पहिला अभिनेता ठरला आहे, ज्याच्या नावावर एक संपूर्ण बिल्डिंग चेन तयार केली जात आहे. हे फक्त त्याच्या लोकप्रियतेचे नव्हे तर जागतिक स्तरावरील प्रभावाचेही उदाहरण आहे.

या निमित्ताने शाहरुख खानने व्यक्त केलेल्या भावना विशेष होत्या. त्याने सांगितले की त्याची आई हे पाहून सर्वात जास्त आनंदी झाली असती. त्याच्यासाठी हा एक मोठा सन्मान असून, मुले जेव्हा या इमारतीत येतील तेव्हा त्यांना आपल्या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या टॉवरकडे अभिमानाने दाखवता येईल. त्याने हेही सांगितले की गेल्या दोन महिन्यांत त्याने या प्रोजेक्टच्या प्रत्येक तपशीलाचे बारकाईने निरीक्षण केले आहे. ही इमारत अत्याधुनिक सुविधांनी युक्त असूनही किफायतशीर असेल. दुबईमध्ये स्वतःच्या करिअरची किंवा व्यवसायाची सुरुवात करणाऱ्या लोकांसाठी ही इमारत प्रेरणादायी तसेच उपयुक्त ठरणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, या 55 मजली टॉवरमध्ये जवळपास 1 मिलियन स्क्वेअर फूट बिल्ट-अप स्पेस असेल. याशिवाय हेलीपॅड, स्काय पूल, बिझनेस लाउंज, आधुनिक ऑफिस स्पेस, ग्रीन झोन्स आणि इतर 40 हून अधिक सुविधा येथे उपलब्ध असतील. या प्रोजेक्टच्या बांधकामावर 4000 कोटी रुपयांहून अधिक खर्च अपेक्षित आहे. Danube Group मध्यपूर्वेतल्या सर्वात मोठ्या रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक आहे. कंपनी Shahrukhz प्रोजेक्टला दुबईतील एक महत्त्वाचा टुरिझम हब बनवण्याचा विचार करत आहे. दुबईमधील पहिल्या टॉवरनंतर कंपनीची योजना न्यूयॉर्कसह जगातील इतर मोठ्या शहरांमध्येही Shahrukhz नावाने आणखी इमारती उभारण्याची आहे.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News