हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री कामिनी कौशल यांचे वयाच्या 98 व्या वर्षी निधन झाले आहे. कामिनी कौशल यांच्या कारकिर्दीची सुरुवात सात दशकांहून अधिक काळ झाली, त्यांचा पहिला चित्रपट “नीचा नगर” (1946 ) होता, ज्याने पहिल्या कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकला आणि पाम डी’ओर जिंकणारा हा एकमेव भारतीय चित्रपट आहे. या चित्रपटासाठी त्यांना मॉन्ट्रियल फिल्म फेस्टिव्हल पुरस्कार मिळाला, ज्यामुळे त्यांना एक प्रतिभावान नवोदित कलाकार म्हणून स्थापित करण्यात आले.
कामिनी कौशल यांची प्रभावशाली कारकीर्द
बॉलिवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री कामिनी कौशल यांचं वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झालंय. अनेक वर्षांच्या करिअरमध्ये कामिनी यांनी गाजलेल्या भूमिका साकारल्या. त्यांच्या साधेपणा, प्रतिभा आणि प्रभावी अभिनय कौशल्यानं चाहत्यांच्या मनात स्थान निर्माण केलं. त्यांच्या जाण्यानं चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. कामिनी वयाशी संबंधित आजारांनी ग्रस्त होत्या. कामिनी कौशल यांच्या कुटुंबाशी जवळचा संबंध असलेल्या एका सूत्रानं सांगितलं की, ‘कामिनी कौशल यांचे कुटुंब त्यांची प्रायव्हसी बाळगू इच्छितं.’ कामिनी यांनी १९४६ मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आणि ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटांपासून त्यांच्या करिअरची सुरुवात केली.

अनेक गाजलेल्या सिनेमांत दर्जेदार अभिनय
२४ फेब्रुवारी १९२७ रोजी जन्मलेल्या कामिनी कौशल यांनी त्यांच्या संपूर्ण करिअरमध्ये असंख्य चित्रपटांमध्ये काम केलंय. त्यांनी दिलीप कुमार आणि राज कपूर यांच्यासह अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलंय. कामिनी कौशल यांनी शहीद, नदीया के पार, शबनम, आरजू और बिराज बहू, दो भाई, जिद्दी, शबनम, पारस, नमूना, झांझर, आब्रू, बडे सरकार, जेलर आणि नाईट क्लब यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. कामिनी यांचा ‘नीचा नगर’ हा चित्रपट हिट ठरलेला. या सिनेमानं पहिल्या कान्स चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार जिंकलेला. चित्रपटांसोबतच कामिनी दूरदर्शनवर प्रसारित होणाऱ्या ‘चांद सितारे’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्येही दिसल्या. कामिनी यांच्या निधनामुळे कला विश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.











