MP Breaking News
Tue, Dec 16, 2025

मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता, समुद्रकिनारी न जाण्याचा प्रशासनाचा इशारा, हवामान विभागाने काय म्हटलंय?

Written by:Astha Sutar
मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळं मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचल्याचे दिसून आले. तर आज मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला असून, मुंबईला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता, समुद्रकिनारी न जाण्याचा प्रशासनाचा इशारा, हवामान विभागाने काय म्हटलंय?

Mumbai Rain – यावर्षी मे महिन्याच्या अखेरीस मान्सून दाखल झाल्याचं हवामान खात्याने म्हटलं होतं. दरम्यान जून महिन्यात पाऊस समाधानकारक पडल्यानंतर आता जूलै महिन्यात सुद्धा पावसाने चांगली हजेरी लावली आहे. तर गेल्या काही दिवसांपासून पाऊस सातत्याने पाऊस बरसत आहे. मुंबईत आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तर समुद्रकिनारी उंट लाटा इशारा देण्यात आलाय, त्यामुळं समुद्रकिनारी न जाण्याचा प्रशासनाने इशारा दिला आहे.

४.६७ मीटर इतक्या उंच लाटांचा  इशारा…

दरम्यान, आज समुद्राला मोठी भरती येणार असल्याचे हवामान विभागाने म्हटलं आहे. त्यामुळं समुद्रकिनारी जाणे टाळावे तसेच याबाबत प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे. समुद्रात आज मोठी भरती असणार आहे. ४.६७ मीटर इतक्या उंचीची लाट उसळणार आहेत. भरती काळादरम्यान नागरिकांनी समुद्रकिनारी जाऊ नये, तसेच या अनुषंगाने प्रशासनाकडून वेळोवेळी देण्यात येणाऱ्या सुचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुंबई पालिकेकडून करण्यात आलेय.

मुंबईला ऑरेज अलर्ट जारी…

मुंबईत आज पहाटेपासून मुसळधार पाऊस बरसत आहे. मुंबई, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, पनवेलमध्ये अधूनमधून पाऊस पडत आहे. तर उपनगरातील अंधेरी, बोरिवली, कल्याण, डोबिंवली, अंबरनाथ, उल्हासनगर, बदलापूर, वसई, विरार आदी ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. तसेच आज हवामान विभागाकडून मुंबईला ऑरेज अलर्ट देण्यात आला आहे. तसेच समुद्रकिनारी मोठी सुरक्षा यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. तसेच गरज असेल तरच घराबाहेर पडा, असं प्रशासनाने म्हटलं आहे.

२-३ दिवसांपासून मुंबईत मुसळधार…

दुसरीकडे मुंबईत गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्यामुळं मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचल्याचे दिसून आले. सायन, दादर, हिंदमाता परिसर तसेच अंधेरी येथे पाणी मोठ्या प्रमाणात साचले होते. शुक्रवारी पावसाचे पाणी साचल्यामुळं अंधेरी सब वे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता. तर मुंबईतील पावसामुळं रेल्वे वाहतूकीवरही परिणाम दिसून आला होता. दरम्यान, आज मुंबईत मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याने म्हटले आहे. तसेच मुंबईला हवामान खात्याकडून ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.