नखांवरून आढळू शकतात धोकादायक आजारांची लक्षणे, ‘ही’ लक्षणे दिसताच वेळीच व्हा सावध!

Asavari Khedekar Burumbadkar

तुमच्या शरीरात कोणताही आजार सुरू होण्यापूर्वी, त्याची काही लक्षणे दिसून येतात. जर या लक्षणांकडे दुर्लक्ष केले तर ते गंभीर आजाराचे रूप धारण करू शकतात. नखांवरून अनेकदा गंभीर आजारांची लक्षणे दिसू शकतात, म्हणून त्यांना दुर्लक्षित करणे योग्य नाही. नखांवर दिसणारी काही चिन्हे गंभीर आजाराबद्दल देखील संकेत देत असतात. नखे कोणते आजार दर्शवतात ते सविस्तरपणे जाणून घेऊया.

वारंवार नखे तुटणे

जर तुमचे नखे वारंवार तुटत असतील किंवा खूप कमकुवत असतील तर ते तुमच्या शरीरात पोषक तत्वांची कमतरता दर्शवते. याचा अर्थ असा की तुमच्या शरीरात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यांसारख्या पोषक तत्वांची कमतरता आहे. हेच कारण आहे की तुमचे नखे कमकुवत झाले आहेत. शरीरात लोहाची कमतरता असेल तर त्यामुळे नखे कमकुवत होऊन तुटायला लागतात. जर तुमच्या नखांमध्ये विशिष्ट आकार दिसत असेल तर तुम्ही तुमची लोहाची पातळी एकदा तपासून पहा.

नखांचा रंग बदलणे

जर तुमचे नखे फिकट दिसू लागले तर तुम्ही काळजी घेतली पाहिजे. हे काही मोठ्या आजाराचे संकेत देतात. रंगीत नखे म्हणजे तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता, अशक्तपणा, कुपोषण, यकृताच्या समस्या उद्भवू शकतात.

नखांवर पांढरे डाग

नखांवर पांढरे डाग येणे हे अनेकदा काही गंभीर आजारांची लक्षणे असू शकतात. हे डाग नखांना झालेली दुखापत, बुरशीजन्य संसर्ग, पौष्टिक कमतरता किंवा काही आजार यामुळे येऊ शकतात. मधुमेह, हृदयविकार, एचआयव्ही, यकृत सिरोसिस आणि सोरायसिस यांसारख्या आजारांमुळे देखील नखांवर पांढरे डाग येऊ शकतात. नखांवरील पांढरे डाग झिंकच्या तुटवड्यामुळे किंवा फंगल इन्फेक्शनचे लक्षण असू शकते, असे तज्ज्ञ सांगतात. काही वेळा शरीरातील ऍलर्जीमुळेही पांढरे डाग दिसतात.

रंगात बदल

तुमच्या नखांचा रंग बदलणे हे देखील एखाद्या आजाराचे लक्षण आहे. जर नखांचा रंग हलकासा निळा झाला असेल तर याचा अर्थ असा झाला की, शरीराला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. हे फुफ्फुस आणि हृदयरोगाचे लक्षण असू शकते.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)

ताज्या बातम्या