Ashish Shelar – पावसात मुंबईची तुंबई हे ठरलेले समीकरण आहे. पावसात पाणी साचू नये किंवा पाणी तुंबू नये यासाठी पालिकेकडून नाले सफाई करण्यात येत आहे. या नाले सफाईची पाहणी मंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांनी केली. मात्र क्षेपणाभूमीवर टाकण्यात येणाऱ्या नालेसफाईच्या गाळाचे “एआय” ने केलेल्या विश्लेषणात तब्बल 40% फेरफार झाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.
डेटा ऍनालिसीस करा
दरम्यान, मंत्री आशिष शेलार यांनी नाले सफाईचा आढावा घेतला. दरम्यान, यासंदर्भात तातडीने पालिका आयुक्तांनी डेटा ऍनालिसीस करा आणि कंत्राटदाराकडून १०० टक्के अपेक्षित काम करुन घ्या, आयुक्तांनी रस्त्यावर उतरून पहाणी करा, असे निर्देश मंत्री शेलार यांनी दिले. मुंबईतील घाटकोपर, लक्ष्मी नगर नाल्यापासून पाहणी दौऱ्याला सुरुवात केली. ते ए.पी. आय नाला, उषा नगर नाला, माहुल नाला, माहुल खाडी परिसर आणि खारु खाडी येथील कामाची पाहणी केली. यावेळी जिथे काम व्यवस्थित झाले नाही. त्याबाबत अधिकाऱ्यांना शेलारांनी जाब विचारला.

तो गाळ त्याच ठिकाणी पडतो
कशा पद्धतीने हे मँपिंग केले जाते याची विचारणा केल्यानंतर अधिकाऱ्यांनी काही व्हिडीओ दाखवले. यावर्षी महानगरपालिकेच्या माध्यमातून AI च्या वापराने गाळ मोजणी आणि इतर कामांच्या मॅपींगला सुरुवात झाली आहे. प्रत्येक ट्रिपमधून नालेसफाईचा जो गाळ जातो, तो गाळ ज्या ठिकाणी पडतो, याचे जे व्हिडिओ येतात त्याला AI च्या माध्यमातून स्कॅन केले जाते. त्यात ४० हजाराच्या वर फेऱ्या झाल्या असून त्यातील १७ हजार गाड्यांच्या फेऱ्यांमध्ये फेरफार सापडला आहे. असे शेलारांनी सांगितले.