दहावीचा निकाल नेमका कधी जाहीर होणार? कसा बघायचा निकाल? जाणून घ्या सविस्तर

महाराष्ट्र बोर्डाच्या दहावी परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याची प्रतीक्षा सर्वांना आहे. हा निकाल 20 मे पूर्वी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्याबाबत लवकरच अधिकृत घोषणा होऊ शकते.

महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा पालक आणि विद्यार्थ्यांना आहे. निकाल कधी लागणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. हा निकाल 20 मे पूर्वीच जाहीर होऊ शकतो. विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा आता लवकरच संपणार असून दहावीचा निकाल बोर्डाकडून देण्यात आलेल्या अधिकृत वेबसाईटवर विद्यार्थी पाहू शकतील.

दहावीचा निकाल कधी?

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीच्या परीक्षेचा निकाल अलीकडेच जाहीर करण्यात आला. आता सर्वांना प्रतीक्षा आहे ती दहावीच्या निकालाची. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच दहावीच्या निकालाची अधिकृत तारीख आणि वेळ जाहीर करण्यात येणार आहे. परंतु हा निकाल 20 मे पूर्वीच जाहीर होईल,, अशी शक्यता वर्तवली जात आहे. विद्यार्थी बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट्सवर आपला निकाल पाहू शकणार आहेत.

12वीच्या परीक्षेचा निकाल 5 मे रोजी जाहीर करण्यात आला. बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाल्यावर आता 10 वीच्या परीक्षेचा निकाल कधी जाहीर होणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दहावीच्या परीक्षेचा निकाल लवकरच जाहीर करण्यात येणार आहे. बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवर याबाबत अधिक माहिती देण्यात येईल. 10वीचा निकाल 20 मे पूर्वी जाहीर केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र, शिक्षण मंडळाकडून याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाहीये. जाणून घेऊयात विद्यार्थी आपला निकाल कसा पाहू शकतील.

दहावीच्या परीक्षेचा निकाल कसा पहाल?

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ हे बारावी (HSC), दहावी (SSC) या बोर्ड परीक्षांचे निकाल mahahsscboard.maharashtra.gov.in जाहीर करतं. पाहा आपण आपला निकाल कसा पाहू शकता.

MSBSHSE ची अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in वर जा

Maharashtra SSC result 2025 लिंक आपल्याला होम पेजवर दिसेल. त्यावर क्लिक करा.

त्यानंतर रिझल्ट पेज ओपन होईल

या ठिकाणी विद्यार्थ्यांना आपला रोल नंबर आणि आईचं नाव टाकायचं आहे.

ही माहिती भरुन सबमिट बटणावर क्लिक करावे. त्यानंतर तुम्हाला आपल्या स्क्रिनवर निकाल पाहता येईल.

त्यामुळे लवकरच दहावीची परीक्षा देणारे विद्यार्थी आणि पालकांची प्रतीक्षा संपेल आणि निकाल पाहता येतील असं सांगितलं जात आहे. पुढे अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन राबवली जाणार असल्याची माहिती आहे.

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (इ. 10 वी) 21 फेब्रुवारी ते 17 मार्च 2025 या कालावधीमध्ये घेण्यात आली. तर, प्रात्यक्षिक, श्रेणी, तोंडी परीक्षा व अंतर्गत मूल्यमापन परीक्षा 3 फेब्रुवारी ते 20 फेब्रुवारी 2025 या कालावधीत घेण्यात आली होती.

About Author

Rohit Shinde

Other Latest News