मुंबई-पुणे मिसिंग लिंक प्रकल्पाबाबत मोठी अपडेट; नेमका कधी खुला होणार केबल स्टेडी ब्रिज?

Rohit Shinde

यशवंतराव चव्हाण मुंबई- पुणे द्रुतगती महामार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार आहे. या प्रकल्पतील एक बोगदा देशातील सर्वात लांब बोगदा असून या प्रकल्पामुळे पुणे-मुंबई प्रवासाचा वेळ अर्धा तासाने कमी होणार आहे. बऱ्याच काळापासून या प्रकल्पातील बोगदा आणि पुलाचे काम सुरू आहे. त्यामुळे हा मिसिंग लिंक वाहतूकीसाठी नेमका कधी खुला होणार हा प्रश्न सातत्याने विचारला जातो. अशा परिस्थितीत या केबल स्टेडी ब्रिजच्या बाबतीत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

प्रकल्पाचे 96% काम पूर्ण; कधी खुला होणार?

महाराष्ट्रातील सर्वात महत्त्वाकांक्षी पायाभूत सुविधांपैकी एक असलेला मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील मिसिंग लिंक अखेर पूर्णत्वाकडे वाटचाल करत आहे. या प्रकल्पातील अनेक महत्त्वाच्या घटकांवर मोठी प्रगती झाली असली तरी त्याच्या उद्घाटन तारखेबद्दल अनिश्चितता अजूनही कायम आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून हा मार्ग सुरू होण्याची प्रवासी वाट पाहत आहेत. परंतु या मार्गाचे उद्घाटन आता 2026 मध्ये ढकलण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. तसेच त्याची नवीन तारीख देखील अद्याप निश्चित असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु पुढील सहा महिन्यात हा मार्ग वातुकीसाठी खुला होण्याची अपक्षा आहे.

केबल स्टेडी ब्रिजच्या कामाबाबत अपडेट

एमएसआरडीसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकल्पाचे 96 टक्के पेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे. परंतु केबल-स्टेड पूल हा तांत्रिकदृष्ट्या सर्वात कठीण भाग आहे. वाऱ्याचा वेग, मुसळधार पाऊस आणि दरीची खोली यामुळे त्याचे काम मंदावले आहे. या कठीण परिस्थितीमुळे अभियंत्यांना अतिरिक्त सावधगिरी बाळगावी लागत आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई आणि पुणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार आहे.

लोणावळा-खंडाळा घाटांच्या खडकाळ भूप्रदेशातून बाहेर पडून हा प्रकल्प आता एका निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. टायगर व्हॅली येथील 650 मीटर लांबीच्या केबल-स्टेड पुलाचा डेक जवळजवळ पूर्ण झाला आहे. पावसाळ्यानंतरच्या बांधकामाला वेग आला असून डेकचा फक्त शेवटचा भाग जोडणीच्या प्रतीक्षेत आहे. हवामान आणि भूप्रदेशाची परिस्थिती अनुकूल राहिल्यास पुढील चार महिन्यांत हा शेवटचा तुकडा जोडण्याचे पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे.

ताज्या बातम्या