PM KISAN: पीएम किसान योजनेच्या २२ व्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; पैसे वितरीत होण्याआधी ‘ही’ प्रक्रिया पूर्ण करून घ्या!

पीएम किसान योजनेचा २२ वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यास अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहू शकतात.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना ही देशातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची योजना मानली जाते. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दर चार महिन्यांनी 2,000 रुपयांचा हप्ता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केला जातो. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्यासाठी दिला जाणारा हा आधार मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरतो. दरम्यान, या योजनेचा 22 वा हप्ता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे. मात्र, काही आवश्यक प्रक्रिया पूर्ण न केल्यास अनेक शेतकरी या लाभापासून वंचित राहू शकतात. त्यामुळे PM किसान योजनेत नोंद असलेल्या सर्व शेतकऱ्यांनी तातडीने आपली कागदपत्रे आणि पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.

लवकर ‘ही’ प्रक्रिया पूर्ण करून घ्या !

अनेकदा शेतकरी काही महत्त्वाची प्रक्रिया पूर्ण करण्यात अयशस्वी ठरतात, ज्यामुळे हप्ता खात्यात जमा होत नाही. शासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे जमिनीसंदर्भातील काम वेळेत पूर्ण न झाल्यास 22 वा हप्ता मिळण्यात विलंब होऊ शकतो किंवा हप्ता रोखला जाऊ शकतो. PM किसान लाभ मिळण्यासाठी लागवडीयोग्य जमिनीची पडताळणी करणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांच्या शेतजमिनीची सत्यता तपासण्यासाठी ही प्रक्रिया केली जाते. जर जमीन पडताळणी वेळेवर झाली नाही, तर संबंधित शेतकऱ्याचा हप्ता रोखला जाऊ शकतो. म्हणून शेतकऱ्यांनी आपल्या गावातील तलाठी किंवा संबंधित महसूल विभागाकडे जाऊन ही प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी.

या योजनेअंतर्गत निधीद्वारे पाठवला जातो. जर तुमच्या बँक खात्यात DBT सुविधा सक्रिय नसेल, तर केंद्र सरकारकडून पाठवलेला हप्ता खात्यात जमा होणार नाही. म्हणूनच शेतकऱ्यांनी आपल्या बँकेत संपर्क करून DBT सक्रिय आहे का? याची पडताळणी करावी. जर तुम्हाला पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता कोणत्याही अडथळ्याविना मिळवायचा असेल, तर जमीन पडताळणी लवकरात लवकर पूर्ण करणे अत्यंत आवश्यक आहे. ही सर्व प्रक्रिया सोपी असून, वेळेवर पूर्ण केल्यास तुमचा हप्ता खात्यात सुरळीत जमा होईल.

2019 पासून योजना सुरू, शेतकऱ्यांना लाभ

पीएम किसान सन्मान निधी योजना केंद्र सरकारनं फेब्रुवारी 2019 मध्ये सुरु करण्यात आली होती. शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून पीएम किसान सन्मान निधी योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाते. आता रब्बी हंगामाच्या निमित्तानं 21 व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट जमा करण्यात आली आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना एका वर्षात 6  हजार रुपये दिले जातात. आतापर्यंत शेतकऱ्यांना 21 हप्त्यांचे 2000 रुपयांप्रमाणं पैसे देण्यात आले आहेत. आता पीएम किसान सन्मान निधीच्या 22 व्या हप्त्याची रक्कम कधी मिळते याकडे शेतकऱ्याचंं लक्ष लागून आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News