कलर्स मराठीने नुकताच ‘बिग बॉस मराठी ६’ चा एक खास टीझर प्रदर्शित केला आहे, ज्याने यावर्षीच्या शोची थीम आणि धमाका कसा असेल, याची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे. टीझरमध्ये सर्वात महत्त्वाचा संकेत मिळाला आहे तो म्हणजे ‘दरवाजा’. यावेळेस घरात एक नाही, तर अनेक दरवाजे असणार आहेत. दारांमधून येणारा रहस्यमय प्रकाश, त्यांची अनोखी रचना आणि गुढ वातावरण हे सूचित करते की, यंदाचा खेळ अजूनच धमाकेदार होणार आहे.
‘बिग बॉस मराठी ६’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला
मराठी टेलिव्हिजनवरील सर्वात मोठा व सर्वाधिक प्रतीक्षित रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी आपला सहावा सीझन घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. आता बिग बॉसच्या नव्या पर्वाची चाहूल लागताच चर्चांना उधाण येत असून उत्सुकता शिगेला आहे. बिग बॉसच्या घराचा दरवाजा पुन्हा उघडणार आहे. त्याबातची घोषणा कलर्स मराठीने केली आहे. कलर्स मराठीने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पोस्टमध्ये लवकरच बिग बॉस मराठीचा नवा सिझन येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे यावेळच्या पर्वात कोण-कोण स्पर्धक असणार, अशी उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

मराठी बिग बॉस लवकरच येणार हे स्पष्ट झाल्यानंतर आता यंदा बिग बॉसच्या घराची थिम का असेल? सदस्य कोण असतील? घर कसे असेल? यंदाचा गेम प्लॅन काय असणार? असे बरेच प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. सोबतच यंदाच्या बिग बॉस मराठीचे सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजेच रितेश देशमुख करणार की अन्य कोणाकडे याची सूत्रं सोपवली जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
6 व्या सिझनबद्दल प्रेक्षकांच्या मनात अनेक प्रश्न
यंदाचा USP काय असेल? थीम काय असेल? सदस्य कोण असतील? घर कसे असेल? यंदाचा गेम प्लॅन काय असणार? आणि बरंच काही… तसेच यावेळेस सूत्रसंचालन महाराष्ट्राचा लाडका भाऊ म्हणजे रितेश देशमुख करणार का? भाऊचा कट्टा पुन्हाएकदा घराघरात पाहायला मिळणार का ? या सर्व प्रश्नांमुळे बिग बॉसच्या पुनरागमनाची वारे सगळीकडे वाहू लागले आहेत.
सध्या या सिझनबद्दलची सर्व माहिती गुलदस्त्यात ठेवण्यात आली असून ती लवकरच सर्वांसमोर आणली जाणार आहे. सदस्यांची नावे, घराची पहिली झलक, थीमची अधिकृत घोषणा आणि या वर्षीचे मोठे ट्विस्ट हे सर्व लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहेत. हा सिझन प्रेक्षकांना कलर्स मराठी आणि जिओ हॉटस्टारवर पाहायला मिळणार आहे.
स्वागतासाठी व्हा तयार, कारण लवकरच उघडणार आहे मनोरंजनाचे दार! 🔥
बिग बॉस मराठी सीझन 6 लवकरच, फक्त कलर्स मराठीवर!#ColorsMarathi #BiggBossMarathi6 #Teaser #ComingSoon
[Colors Marathi, Bigg Boss Marathi 6, Teaser, Big Announcement, Coming Soon] pic.twitter.com/uivV4tTxCG
— Colors Marathi (@ColorsMarathi) November 24, 2025











