‘केंब्रिज’सोबतचा सामंजस्य करार जागतिक दर्जाच्या शिक्षणाचा नव्या वाटा निर्माण होतील, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विश्वास

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील ‘विकसित भारत’ दृष्टीकोनातून महाराष्ट्र शिक्षण क्षेत्रात देशाचे नेतृत्व करेल, असा विश्वास डॉ. भोयर यांनी व्यक्त केला. केंब्रिजसोबतच्या करारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठिंबा दिल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.

CM Devendra Fadnavis : जागतिक दर्जाच्या शिक्षणाबाबत एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. जागतिक दर्जाचे शिक्षणा देशातील विद्यार्थ्यांना मिळावे, यासाठी सरकारने पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रात विद्यार्थी आणि शिक्षकांची संख्या मोठी असून, केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडियाकडे कौशल्य आहे. दोघांमधील सामंजस्य करार हा राज्यातील शालेय शिक्षणाला जागतिक दर्जा प्राप्त होण्यासाठीचा नवा टप्पा ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण विभाग आणि केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंट इंडीया दरम्यान सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर केंब्रिजच्या वतीने आंतरराष्ट्रीय शिक्षण गटाचे व्यवस्थापकीय संचालक रॉड स्मिथ उपस्थित होते.

विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल

आज आपण सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे, तथापि हे पहिले पाऊल असून अजून मोठा प्रवास बाकी आहे. या प्रवासात आपण केंब्रिजसोबत भागीदार राहणार आहोत. या करारामुळे तो प्रवास अधिक फलदायी ठरेल. केंब्रिज हे शिक्षण क्षेत्रातील सर्वात मोठे नाव असल्याचे नमूद करताना त्यांनी, केंब्रिजने शिक्षण क्षेत्रात विकसित केलेल्या चांगल्या पद्धतींमुळे राज्यातील विद्यार्थ्यांना मोठा फायदा होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. दरम्यान, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानंतर पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळविण्याच्या दिलेल्या संधीच्या दिशेने महाराष्ट्राने प्रवास सुरु केला आहे. या करारामुळे केंब्रिजचे कौशल्य आणि राज्यातील शिक्षण क्षेत्र एकत्र आल्याने विद्यार्थ्यांना असे शिक्षण मिळवून देता येईल. असं मुख्यमंत्री म्हणाले.

शालेय शिक्षणात ऐतिहासिक पाऊल

हा करार विद्यार्थ्यांचे भविष्य घडवणारा आणि नव्या पिढीतील नाविन्यपूर्ण व नेतृत्वक्षम तरुणांना दिशा देणारा ठरेल, महाराष्ट्र राज्य प्रशासन, पायाभूत सुविधा आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांत सातत्याने नवे आदर्श निर्माण करत आहे. आज केंब्रिज युनिव्हर्सिटी प्रेस अँड असेसमेंटसोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे शालेय शिक्षणात जागतिक दर्जाकडे एक पाऊल पुढे टाकले गेले आहे, असा विश्वास शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी यावेळी व्यक्त केला. लाखो सामान्य कुटुंबातील मुले असामान्य स्वप्ने पाहतात. या मुलांना केवळ शिक्षण नव्हे तर दर्जेदार गुणवत्ता प्रमाणपत्र मिळावे, यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आजच्या करारामुळे जागतिक दर्जाचे शिक्षण मिळण्याकडे आपण पुढे पाऊल टाकले असल्याचे डॉ. भोयर म्हणाले.


About Author

Astha Sutar

Other Latest News