Maharashtra Politics : येत्या 19 डिसेंबरला संपूर्ण जगात एक मोठा राजकीय भूकंप होईल. त्याचे पडसाद आपल्या भारतावर पाहायला मिळेल आणि एक मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होईल असं मोठं भाकीत काँग्रेसचे दिग्गज नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केलं होतं. पृथ्वीराज चव्हाण यांच्या दाव्यानंतर संपूर्ण देशात खळबळ उडाली. पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा पंतप्रधान कार्यालयात काम केलेला नेता असे सांगतोय म्हणजे नक्कीच काहीतरी त्यांना माहिती असणार असं अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे. तर दुसरीकडे भाजपने मात्र पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा सपशेल खोडून काढला. आता याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारलं असता त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना टोला लगावला आहे.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस (Maharashtra Politics)
प्रसार माध्यमांशी बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, आत्तापर्यंत वेगवेगळ्या नेत्यांना साक्षात्कार होत होते, त्यांना स्वप्न पडत होती हे आम्ही पाहिलेलं आहे. मात्र, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारखा ज्येष्ठ नेता, जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत, पीएमओचे मंत्री राहिले त्यांनाही असे साक्षात्कार व्हायला लागला म्हणजे निश्चितच यात काहीतरी काळबेरं आहे. त्यामुळे, त्यांचं आरोग्य उत्तम राहावं या त्यांना शुभेच्छा आहेत. तसेच, असा विचार करुन त्यांनी स्वत:ला फार त्रास करुन घेऊ नये, असा माझा त्यांना सल्ला असल्याचंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं. Maharashtra Politics
पृथ्वीराज चव्हाण यांचा नेमका दावा काय?
अमेरिकेतील एक व्यक्ती जो इस्त्राईलचा गुप्तहेर होता. त्याने अनेक दिग्गज व्यक्तींच्या बंगल्यात कॅमेरे लावून स्टिंग ऑपरेशन केलेत, आता लवकरचं तो अनेकांचा पर्दाफाश करणार आहे. त्यामुळं अमेरिकेत मोठा धुमाकूळ होणार आहे. अमेरिका सरकार एक कायदा करुन येत्या 19 डिसेंबरला त्या दिग्गजांची नावं जाहीर करणार आहे असा दावा चव्हाणांनी केला आहे. आता यात कोणाकोणाची नावं आहेत? याची मला कल्पना नाही, पण अमेरिकेतल्या स्टिंग ऑपरेशनचे पडसाद भारतात उमटण्याची शक्यता वर्तवली आहे. तसेच यामुळे एक मराठी माणूस देशाचा पंतप्रधान होईल असे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले. जो देशाचा नवा पंतप्रधान असेल तो काँग्रेसचा नसेल कारण आमच्याकडे काही बहुमत नाही असे मत पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले





