Mumbai To Latur Expressway : मागील काही वर्षापासून महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी नवनवीन महामार्ग उभारण्यात आले आहेत. अजूनही अनेक जिल्ह्यात उड्डाणपूल आणि रस्त्यांची कामे सुरू आहेत. रस्ते बांधणीमुळे वाहतूक आणि दळणवळण सोप्प झालं आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात आणखी एका नव्या महामार्गाची घोषणा केली. या महामार्गामुळे मुंबई आणि मराठवाड्यातील कनेक्टिव्हिटी आणखी जलद होणार आहे
लातूर कल्याण महामार्ग (Mumbai To Latur Expressway)
महाराष्ट्र आता थांबणार नाही, असा पुनरुच्चार करताना फडणवीस यांनी मुंबई आणि मराठवाड्यातील लातूरला जोडणा-या जनकल्याण द्रुतगती महामार्गाची घोषणा केली. देवेंद्र फडणवीस म्हणाले, हैदराबाद-लातूर-कल्याण-मुंबई जनकल्याण द्रुतगती महामार्ग उभारण्यात येणार असून यासाठी ३६ हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. या महामार्गाचा ४५० भाग महाराष्ट्रात आहे. ६१ किलोमीटर कर्नाटक, तेलंगणात ७९ किलोमीटर आहे. एकदा का हा महामार्ग उभारण्यात आला की मग अवघ्या साडेचार तासांत लातूरहून मुंबईला पोहचता येणार आहे. Mumbai To Latur Expressway
शक्तिपीठ महामार्गाचा रूट बदलला
दरम्यान, कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाला होत असलेला तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आज विधानसभा सभागृहात शक्तिपीठ महामार्ग कुठून कसा जाणार याची सुद्धा माहिती सादर केली.शक्तिपीठ महामार्गाची वेगळी अलाइनमेंट ही चंदगड पासून सोलापूर, सांगलीपासून जाते, आमचे जयंतराव पहिल्यांदा सुटून गेले होते, शक्तीपीठ मार्गातून आता त्यांच्याजवळ महामार्गाने पोहोचता येईल, कारण हा महामार्ग वाळवा तालुक्यातून जाणार आहे. या महामार्गाचे नाव नाव जरी नागपूर गोवा महामार्ग असला तरी देखील याचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार आहे, मराठवाड्याचे चित्र हा एक महामार्ग बदलून टाकेल





