लाडक्या बहिणींना अद्याप नोव्हेंबर महिन्याचा हप्ता मिळालेला नाहीये. तसेच ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख सुद्धा जवळ आली आहे. आता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता नेमका कधी मिळणार आणि ईकेवायसी केली नाही तर काय होईल? असे अनेक प्रश्न खरंतर महिलांना पडले आहेत. अशा परिस्थितीत आता या संदर्भात मोठ्या अपडेट्स समोर येत आहेत. ज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबरचा हप्ता हा डिसेंबर महिन्याच्या 4 तारखेनंतर मिळण्याची शक्यता होती. मात्र, राज्यातील काही नगरपरिषद आणि नगरपंचायतींसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे एकूणचं नोव्हेंबर महिन्याचा हप्ता चांगलाच लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
खात्यामध्ये थेट 3,000/- जमा होणार?
हाराष्ट्रात गेम-चेंजर ठरलेल्या महायुती सरकारच्या लाडली बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. या योजनेअंतर्गत, नोव्हेंबर-डिसेंबरचा हप्ता आता लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच वेळी हस्तांतरित केला जाईल. नोव्हेंबर २०२५ साठीचा नियोजित ₹१,५०० चा हप्ता अद्याप लाभार्थ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केलेला नाही. सरकार आता नोव्हेंबर आणि डिसेंबर दोन्हीसाठी एकत्रितपणे एकूण ₹३,००० जमा करण्याची तयारी करत आहे. ७ डिसेंबरपर्यंत नवीन हप्ता न आल्यामुळे, अनेक महिलांनी चिंता व्यक्त केली की केवायसी कागदपत्रांच्या अभावामुळे त्यांचे पेमेंट उशिरा झाले असावे.

योजनेनुसार, १७ वा हप्ता डिसेंबरमध्ये लाडली बहन कुटुंबाच्या खात्यात जमा होणार होता. तथापि नोव्हेंबर महिन्यातील प्रलंबित पेमेंटमुळे, आता १७ वा आणि १८ वा हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच वेळी हस्तांतरित केला जाईल. राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे की प्रत्येक महिला लाभार्थ्याने ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत त्यांचे केवायसी पूर्ण करावे. राज्यात सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू आहेत आणि निकाल २१ डिसेंबर रोजी जाहीर केले जातील. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की सरकार घोषणा आणि देयक हस्तांतरण दोन्हीमध्ये आचारसंहितेचे पालन करू इच्छित आहे.
ई-केवायसीला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदतवाढ
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत सुरू असलेल्या महिलांच्या ई-केवायसी प्रक्रियेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. तथापि, अलीकडील काही जिल्ह्यांमध्ये उद्भवलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे तसेच लाभार्थी महिलांकडून आलेल्या विविध अडचणींमुळे सरकारला ही प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ई-केवायसीसाठी दिलेली अंतिम मुदत वाढवण्यात आली आहे. या आधी 18 नोव्हेंबर 2025 ही निश्चित केलेली अंतिम तारीख होती, मात्र आता ती 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे. ही माहिती राज्याच्या महिला आणि बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. त्यामुळे एकूणच येणारा हप्ता तरी सरसकट सर्व महिलांना मिळेल, अशी शक्यता निर्माण झालेली आहे.