तमाशाला पर्याय म्हणून गौतमी पाटील यांच्या कार्यक्रमाला नागरिक पसंती देत आहेत. सगळ्या राज्याला तिने वेड लावलं आहे. गौतमीची महाराष्ट्रातील जनमाणसांत चांगलीच क्रेझ आहे. अशा परिस्थितीत सध्या तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या नृत्यांगना गौतमी पाटील आपल्या अभिनय क्षेत्रातील कामामुळे देखील सातत्याने चर्चेत आहे. अशा परिस्थितीत एका मुलाखतीत गौतमी पाटीलने एक महत्वपूर्ण खुलासा केला आहे.
गौतमीला नेमकी कोणत्या गोष्टीची भीती ?
‘सबसे कातील गौतमी पाटील’ने आजवर महाराष्ट्रातील विविध ठिकाणी स्टेज गाजवलं आहे. स्टेज शो करण्यासह गौतमी पाटील सोशल मीडियावरही सक्रीय आहे. तिचा मोठा चाहतावर्ग आहे. स्टेज शो करण्यासह गौतमी छोटा पडदा आणि रुपेरी पडदा गाजवतानाही दिसते. ‘रुपेरी वाळूत’ या गाण्याच्या प्रमोशनदरम्यान गौतमी पाटीलने आपल्याला वाटत असलेल्या भीतीबाबत मोकळेपणाने भाष्य केलं आहे. गौतमीला अभिनय करण्याची प्रचंड भीती वाटते.

गौतमी म्हणते,”अभिनय मला नको वाटतो. मला नृत्याची खूप आवड आहे. पण मला जेवढा डान्स आवडतो तेवढा अभिनय आवडत नाही. ‘रुपेरी वाळूत’ हे गाणं मला मिळाल्यानंतर त्यात अभिनय करायचा आहे नृत्य हे मला शूटिंगच्या दिवसापर्यंत माहिती नव्हतं”. गौतमी पाटीलवर टिका करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे तिचे सोशल मीडियावर लाखो चाहते आहेत. तिचा डान्स पाहण्यासाठी हजारोंच्या संख्येने गर्दी होत असते. घरच्या परिस्थितीमुळे आपण नृत्य क्षेत्राकडे वळल्याचे ती सांगते.
गौतमीच्या ‘रूपेरी वाळूत’ची सर्वत्र चर्चा
आपल्या डान्स स्टेप्ससाठी प्रसिद्ध असणारी आणि कातील अदांनी चाहत्यांना वेड लावणारी महाराष्ट्राची सुप्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील सध्या एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आहे. गौतमीचं अभिजीत सावंतसोबत ‘रुपेरी वाळूत’ हे नवं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. गौतमी पाटील आणि अभिजीत सावंत यांचं ‘रुपेरी वाळूत’ हे नवं गाणं 5 डिसेंबर 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. अलिबागच्या समुद्रकिनारी, रुपेरी वाळूत गौतमी आणि अभिजीत यांनी हे गाणं शूट केलं आहे. रिलीज होताच हे गाणं प्रेक्षकांना मोहित करण्यात यशस्वी ठरत आहे.
गौतमी पुढे म्हणाली,”रुपेरी वाळूत’ या गाण्याची आम्ही काहीही तालिम वगैरे केली नव्हती. ऑन द स्पॉट हे गाणं शूट करण्यात आलं आहे. आमचे टेकवर टेक होत होते. पण अभिजीत आणि मी एकमेकांना सपोर्ट करतं या गाण्याचं शूटिंग पूर्ण केलं. अभिनय करायचा म्हटलं की मला एक दडपण येतं”. एखाद्याच्या अंगात काहीतरी कला असते असं सांगत गौतमी पाटील म्हणाली की, या क्षेत्रात आल्यानंतर मी सगळ्या अदा शिकले. स्टेज हे माझ्यासाठी एवढी मोठी गोष्ट आहे की सगळं विसरून डान्स करते. समोरच्या प्रेक्षकांचा विचार करून त्याला आनंदी ठेवणं, त्याचं मनोरंजन करणं हाच उद्देश असतो.











