मान्सूनपूर्व पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान, बळीराजा मदतीच्या प्रतिक्षेत…

Astha Sutar

State Rain – देशात आणि राज्यात मान्सून दाखल होण्यास १५ ते २० दिवसांचा अवधा आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. वादळी वारा आणि गारपीटासह पावसाने झोडपून काढले. तसेच राज्यात पुढील दोन ते तीन पावसाचा अंदाज हवामान खात्याने अंदाज वर्तविला आहे. तर दुसरीकडे अवकाळी पावसामुळं शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेय.

शेती पिकांचे नुकसान कुठे?

दरम्यान, मागील आठवड्यात आणि त्यापूर्वी अवकाळी पावसाने राज्यातील ठिकठिकाणी हजेरी लावली होती. यावेळी राज्यातील विविध भागातील शेती पिकांचे मोठे नुकसान झालेय. गारपीठ आणि सुसाट्याचा वादळी वाऱ्यासह हातातोंडाला आलेली पिकं जमीनदोस्त झालेली आहेत. यामध्ये नाशिकमध्ये द्राक्षे आणि कांद्याचे मोठे नुकसान झाले आहे. तर उत्तर महाराष्ट्रात केळीचे मोठे नुकसान झाले.

दुसरीकडे कोकणात पावसामुळे आंब्याचे दर घसरले आहेत. त्यामुळं आंबा उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. दुसरीकडे विदर्भ आणि मराठवाड्यात तुरीचं मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाल्याने बळीराजा चिंतेत आहे.

पंचनामा करुन मदत मिळावी…

दुसरीकडे अवकाळी पावसामुळं उकाड्याने हैराण झालेल्यांना थंडाव्याचा आणि गारव्याचा दिलासा मिळाला आहे. पण मान्सूनपूर्व पावसाने शेतीचे मोठे नुकसान केले आहे. आंबा, काजू, द्राक्षे, तूर, केळी आदी पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळं या सर्व पिकांचे झालेल्या नुकसान भरपाईचे पंचनामे करावे, आणि सरकारने आर्थिक मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. तर कोकणात हवामान विभागाकडून ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आलेला आहे. तर राज्यात पुढील ३ दिवस अनेक जिल्ह्यामध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटलं आहे.

ताज्या बातम्या