Sanjay Raut – खासदार संजय राऊत यांना भूखंड घोटाळा प्रकरणे इडीने कारवाई करत त्यांना अटक केले होती. यानंतर संजय राऊत हे १०० दिवस तुरुंगात होते. तुरुंगातील अनुभव याचे कथन त्यांनी पुस्तक स्वरूपातून मांडले आहे. त्यामुळे खासदार संजय राऊत यांचे तुरुंगातील ते 100 दिवस, “नरकातला स्वर्ग” हे पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज पार पडणार आहे.
दिग्गजांची उपस्थिती…
दरम्यान, खासदार संजय राऊत यांचे तुरुंगातील ते 100 दिवस, “नरकातला स्वर्ग” हे पुस्तकाचा प्रकाशन सोहळा आज (शनिवारी) पार पडणार आहे. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आणि जेष्ठ गीतकार तथा दिग्दशक जावेद अख्तर यांच्या हस्ते आज पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडणार आहे.

या पुस्तकातून संजय राऊत यांनी अनेक दावे केलेले आहे. तसेच काही गंभीर आरोप सुद्धा केलेले आहेत. दरम्यान, खासदार संजय राऊत यांच्या तुरुंगातील शंभर दिवस, नरकातला स्वर्ग हे पुस्तक प्रकाशन आज मुंबईतील रवींद्र नाट्यमंदिर या ठिकाणी सायंकाळी ६ वाजता दिगजांच्या उपस्थितीत पार पडणार आहे.
पुस्तकातून खळबळजनक आरोप?
दुसरीकडे संजय राऊत यांच्या पुस्तकाचे देशभर चर्चा सुरू आहे. संजय राऊत यांनी या पुस्तकात कोणते मुंडे मांडलेत? सरकारवर कोणती टीका केली आहे? काय गंभीर आरोप केलेत? आणि आपल्याला अटक करण्यासाठी कशाप्रकारे दिल्लीपासून महाराष्ट्रपर्यंत राजकारण करण्यात आले? याची सविस्तर माहिती या पुस्तकात असण्याची शक्यता आहे. तसेच या पुस्तकातून काही खळबळजनक आरोपीही संजय राऊत यांनी केल्याचे माहिती समोर येत आहे. या पुस्तक प्रकाशनावर राजकीय वर्तुळातून आत्ताच प्रतिक्रिया समोर येऊ लागल्या आहेत. माझे वय आता कथा, कादंबऱ्या वाचण्याचे नाही.
त्यामुळे संजय राऊत त्यांचे पुस्तक वाचण्याचा प्रश्नच येत नाही. अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. तर दुसरीकडे संजय राऊत यांचा भूखंड घोटाळा समोर आला तर आणखीन त्याच्या वेगळे पुस्तक लिहावे लागेल. अशी खोचक टीका जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. त्यामुळे संजय राऊत यांच्या पुस्तकातून नेमकी कोणती माहिती आहे याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.











