Shaktipeeth Mahamarg : नागपूर ते गोवा शक्तिपीठ महामार्गाचा रूट बदलला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात या रस्त्याची नवी अलाइनमेंट सांगितली आहे. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात शक्तिपीठ महामार्गाला होत असलेला तीव्र विरोधाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी आज विधानसभा सभागृहात शक्तिपीठ महामार्ग कुठून कसा जाणार याची नवीन माहिती सादर केली.
कुठून कसा जाणार शक्तिपीठ महामार्ग? Shaktipeeth Mahamarg
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, नागपूर गोवा द्रुतगति मार्ग हा एक अतिशय महत्त्वाचा महामार्ग आहे त्याचं नाव जरी नागपूर गोवा असलं तरी देखील याचा सर्वाधिक फायदा हा मराठवाड्याला होणार आहे, मराठवाड्याचे चित्र हा एक महामार्ग बदलून टाकेल. सोलापूर पासून आपली अलाइनमेंट ही जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला समांतर जात होती, आणि त्याच्यामुळे ग्रीनफिल्ड महामार्ग का बनवतो कारण यामुळे नवीन एरिया ओपन होतात, ग्रीन फील्ड महामार्गामुळे न जोडले गेलेले लोक त्याला जोडले जातात आणि ज्या भागात थेट कनेक्टिव्हिटी नाही तू भाग जोडून त्या ठिकाणी विकास होतो, म्हणून जयकुमार गोरे, अभिजित पाटील आणि सर्वांची आम्ही चर्चा केली आणि याची सोलापूर पासून एक वेगळी नवीन अलाइनमेंट आम्ही तयार केली आहे. Shaktipeeth Mahamarg
जयंतरावांच्या मतदारसंघाला फायदा होणार
फडणवीस पुढे म्हणाले, शक्तिपीठ महामार्गाची वेगळी अलाइनमेंट ही चंदगड पासून सोलापूर, सांगलीपासून जाते, आमचे जयंतराव पहिल्यांदा सुटून गेले होते, शक्तीपीठ मार्गातून आता त्यांच्याजवळ महामार्गाने पोहोचता येईल, कारण हा महामार्ग वाळवा तालुक्यातून जाणार आहे. आणि मी तुम्हाला दाव्याने सांगतो की जयंतरावच मला पत्र देतील की हा महामार्ग करा, याचा मोठा फायदा त्यांच्या मतदारसंघाला होणार आहे, पंढरपूर जवळून तो मार्ग जाईल. त्याचं संपादन आपण चालू केलेले आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात बोलताना दिली आहे.





