MP Breaking News
Sun, Dec 14, 2025

मंत्री नितीन नबीन यांच्यावर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी; भाजपाच्या संसदीय मंडळाचा निर्णय

Written by:Rohit Shinde
बिहार सरकारचे मंत्री नितीन नबीन यांची भाजप पक्षाचे नवे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जे पी नड्डा यांचा अध्यक्षपादाचा कार्यकाळ संपला आहे.
मंत्री नितीन नबीन यांच्यावर भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी; भाजपाच्या संसदीय मंडळाचा निर्णय

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवड गेल्या अनेक महिन्यांपासून लांबणीवर पडत असल्याचं चित्र आहे. अध्यक्षपदासाठी अनेक नावांची चर्चा होत असताना पक्षसंघटनेतील काही तांत्रिक बाबींमुळे ही निवड लांबणीवर पडत असल्याचं दिसत आहे. मात्र राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीतील हा अडथळा आता दूर झाला असून भाजपला नवे नेतृत्व मिळाले असून बिहार सरकाराचे मंत्री नितीन नबीन यांची राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  ही नियुक्ती 14 डिसेंबर  2025  रोजी करण्यात आली असून, ती तात्काळ  लागू झाली आहे.

नितीन नबीन यांच्यावर पक्षाकडून मोठी जबाबदारी

बिहार सरकारचे मंत्री नितीन नबीन यांची पक्षाचे नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. जे पी नड्डा यांचा अध्यक्षपादाचा कार्यकाळ संपला आहे. त्यानंतर आता  नितीन नवीन हे पक्षाच्या जबाबदाऱ्या स्वीकारतील. याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. भाजपच्या राष्ट्रीय सरचिटणीसांनी जारी केलेल्या पत्रात म्हटले आहे की, “भारतीय जनता पक्षाच्या संसदीय मंडळाने बिहार सरकारमधील मंत्री नितीन नबीन यांची भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळं आता भाजपला नवीन अध्यक्ष मिळाले आहेत. भाजप अध्यक्ष हे संविधानिक किंवा सरकारी पद नाही. त्यामुळे त्यांना सरकारकडून कोणतेही वेतन दिले जात नाही. त्याऐवजी पक्ष स्वतः आपल्या निधीतून पगार आणि इतर सुविधा देतो.

पंतप्रधान मोदींकडून नितीन नबीन यांना शुभेच्छा

तप्रधान नरेंद्र मोदी यांनी नितीन नबीन यांना भाजपचे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन केले. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक पोस्ट शेअर केली आहे. नितीन नबीन यांनी स्वतःला एक मेहनती भाजप कार्यकर्ता म्हणून स्थापित केले आहे. ते एक तरुण, समर्पित आणि संघटनात्मकदृष्ट्या अनुभवी नेते आहेत. ज्यांचा बिहारमध्ये आमदार आणि मंत्री म्हणून अनेक कार्यकाळात प्रभावी कामगिरी आहे. त्यांनी लोकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पूर्ण समर्पण आणि वचनबद्धतेने काम केल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

जातीय समीकरणं साधण्याचा भाजपाचा प्रयत्न ?

भाजप संघटनेत ही नियुक्ती महत्त्वाची मानली जात असून, आगामी राजकीय रणनीती आणि संघटनात्मक मजबुतीकरणाच्या दृष्टीने नितीन नबीन यांची भूमिका निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. भाजप कार्यकारी अध्यक्षपदासाठी गेल्या काही दिवसात अनेक नावांची चर्चा सुरू होती. अखेर आज झालेल्या या नियुक्तीमुळे सर्व चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. नितीन नबीन यांच्या नियुक्तीमुळे भाजपने जातीय समीकरणे संतुलित करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे.