MP Breaking News
Sun, Dec 14, 2025

Soyabean Price: वाशिमच्या बाजारात सोयाबीनचा दर 5 हजारांच्या पार; शेतकरी सुखावले !

Written by:Rohit Shinde
वाशीम जिल्ह्यात सोयाबीनचे दर तुलनेने मजबूत राहिले. वाशीम बाजारात 3,000 क्विंटल आवक असून कमाल दर 5,200 रुपये इतका मिळाला, तर सरासरी दर 4,500 रुपये राहिला.
Soyabean Price: वाशिमच्या बाजारात सोयाबीनचा दर 5 हजारांच्या पार; शेतकरी सुखावले !

सोयाबीन बाजारात सध्या दरांमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. नव्या हंगामातील आवक वाढत असताना काही बाजार समित्यांमध्ये दर वाढताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी घसरण नोंदली जात आहे. मात्र एकुणच राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या दरामध्ये चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे. वाशिम, जालना भागामध्ये सध्या सोयाबीनला चांगला दर मिळताना दिसत आहे. त्यामुळे परिसरातील शेतकरी सुखावले आहेत.

वाशिम, जालन्यात सोयाबीन 5 हजार पार

वाशीम जिल्ह्यात सोयाबीनचे दर तुलनेने मजबूत राहिलेवाशीम बाजारात 3,000 क्विंटल आवक असून कमाल दर 5,200 रुपये इतका मिळालातर सरासरी दर 4,500 रुपये राहिला. वाशीम-अनसींग येथेही 600 क्विंटल आवक झाली असून सरासरी दर 4,350 रुपये नोंदवण्यात आला. यावरून या भागात दर्जेदार मालाला चांगला भाव मिळत असल्याचे स्पष्ट होते.

विदर्भ, मराठवाडा आणि खानदेशातील अनेक बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची मोठ्या प्रमाणात आवक झाली. जालना बाजार समितीत सर्वाधिक 5,793 क्विंटल आवक नोंदवण्यात आली असून येथे पिवळ्या सोयाबीनला किमान 3,400 रुपये तर कमाल 5,151 रुपये असा दर मिळाला. सरासरी दर 4,400 रुपये राहिला. अकोला बाजारातही 5,265 क्विंटल आवक झाली असून येथे दर 4,000 ते 4,500 रुपयांच्या दरम्यान राहिले, सरासरी 4,450 रुपये नोंदवण्यात आले.

राज्यभरात सोयाबीनच्या दरात सुधारणा

राज्यातील विविध कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये सोयाबीनच्या दरात चढ उतार पाहायला मिळाला. काही प्रमुख बाजारांत दरांनी समाधानकारक पातळी गाठली असलीतरी अनेक ठिकाणी आवक वाढल्याने दरांवर मर्यादा येताना दिसत आहे. पिवळा आणि लोकल सोयाबीनला तुलनेने चांगला प्रतिसाद मिळत असून गुणवत्तेनुसार दरात फरक जाणवत आहे.

राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या दरामध्ये चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे. दर वाढताना दिसत आहेत. त्यामध्ये पिवळ्या सोयाबीन उत्पादकांना अधिकचा दिलासा मिळत आहे. नाफेड खरेदीची अपेक्षा, खुले बाजारातील व्यापाराचा वेग, स्थानिक मागणी आणि आवक यात झालेल्या बदलांमुळे विविध बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर 3,000 ते 5,800 रुपयांच्या दरम्यान राहिले. राज्यातील काही ठिकाणी दरात तेजी दिसून आली. तर काही बाजारांमध्ये घसरण नोंदली गेली.