MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

फक्त या 2 शब्दांनी Miss World होण्याचं स्वप्न पूर्ण; क्राऊन पटकावल्यानंतर काय म्हणाली सुचाता?

Written by:Smita Gangurde
ओपलने मिस वर्ल्डचा किताब पटकावून इतिहास रचला आहे. यंदा पहिल्यांदाच थायलँड मिस वर्ल्डच्या स्पर्धेत विजेता ठरलं आहे.

72 व्या मिस वर्ल्ड २०२५ क्राउन थायलँडच्या ओपल सुचाता चुआंगसरीने पटकावला आहे. या विजयासह तिने एक इतिहास रचला आहे. यापूर्वी थायलँडला कधीच मिस वर्ल्डचा किताब मिळाला नव्हता. यंदा मिस वर्ल्ड स्पर्धेचं आयोजन हैद्राबादमधील तेलंगणामध्ये आयोजित करण्यात आलं होतं. स्पर्धेच्या अंतिम टप्प्यात ओपलने पांढऱ्या रंगाचा अत्यंत सुंदर गाऊन घातला होता. ज्यावर ओपलसारखे फूलचं डिझाइन होतं.  ७१ वी चेक रिपब्लिकची मिस वर्ल्ड क्रिस्टीना पिस्जकोवाने आपलं क्राऊन ओपलला सोपवलं.

ओपल सामाजिक क्षेत्रातही सक्रिय आहे. तिची एक सामाजिक संस्था आहे. या संस्थेच्या माध्यमातून ओपल ब्रेस्ट कॅन्सरसंदर्भात जनजागृतीचं काम करते.

धैर्य आणि दृढ संकल्प हे दोन यशाचे महत्त्वाचे पैलू

आपल्या विजयानंतर ओपलने मीडियाशी संवाद साधला. धैर्य आणि दृढ संकल्प हे दोन शब्द तिच्यासाठी यशाचा मंत्र आहेत. ती पुढे म्हणाली, स्वत:वर विश्वास ठेवणं आणि आपल्या मूल्यांवर कायम राहिल्यामुळे ती इथपर्यंत पोहोचू शकली. या प्रवासात ती बऱ्याचदा थकली, सर्व सोडून द्यावंस वाटतं. मात्र तिने पराभव पत्करला नाही. जर एखादी व्यक्ती आत्मविश्वास आणि ध्येयासाठी तत्पर असेल तर ती कोणतीही संकट पार करू शकतं.

मिस वर्ल्ड २०२५ च्या स्पर्धेत जगभरातील १०८ देशांतील सुंदर तरुणी सहभागी झाल्या होत्या. भारताकडून नंदिनी गुप्ता प्रतिनिधित्व करीत होती. ती स्पर्धेत टॉप २० पर्यंत पोहोचली. नंदिनीने आत्नविश्वास आणि सौंदर्याच्या जोरावर भारताचं प्रतिनिधित्व केलं. मात्र शेवटच्या टप्प्यात ती पुढे जाऊ शकली नाही.

भारतात तीन वेळा मिस वर्ल्ड स्पर्धेचं आयोजन

भारतात आतापर्यंत तीन वेळा मिस वर्ल्डचं आयोजन करण्यात आलं आहे आणि सहा भारतीय सुंदरींनी हा किताब पटकावला आहे. रीता फारिया ते मानुषी छिल्लरपर्यंत भारताने मिस वर्ल्डच्या मंचावर सौंदर्य, बुद्धिमत्ता आणि सामाजिक जबाबदारीसह वारंवार भारताचं नाव मोठं केलं.