MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

Weather Update: महाराष्ट्रात थंडीची लाट कायम राहणार ; तापमानात 7°C पर्यंत घसरण!

Written by:Rohit Shinde
राज्यभरात थंडीची लाट पहायला मिळत आहे. थंडगार वाऱ्यामुळे तापमानात घसरण झाली आहे. यामुळे राज्याच्या अनेक भागांतील तापमानात कमालीची घसरण झाली आहे.

उत्तर भारतातून येणाऱ्या शीतलहरींमुळे राज्यात थंडीची लाट निर्माण झाली आहे. गेल्या आठवडाभरात उत्तर महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला होता. आता डिसेंबरच्या मध्यावर हवामानात पुन्हा मोठे बदल जाणवत आहेत. 13 डिसेंबरचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

महाराष्ट्रात थंडीच्या लाटेचा कहर

राज्यभरात थंडीची लाट पहायला मिळत आहे. थंडगार वाऱ्यामुळे तापमानात घसरण झाली आहे. यामुळे राज्याच्या अनेक भागांतील तापमानात कमालीची घसरण झाली आहे. पुढील काही दिवस राज्यातील अनेक भागांत थंडीची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

मराठवाड्यात काही ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. गेल्या 24 तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवलेले तापमान पाहिले तर मुंबई (कुलाबा) 20.6 अंश सेल्सिअस, अहिल्यानगर 7.3 अंश सेल्सिअस, नाशिक 7.8 अंश सेल्सिअस, गोंदिया 8.4 अंश सेल्सिअस, मालेगाव 8.4 अंश सेल्सिअस होते. राज्यातील सर्वात कमी किमान तापमान अहिल्यानगर येथे नोंदवले गेले.
मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी थंडीची लाट होती. या प्रदेशात किमान तापमानात मोठा बदल झाला नाही. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तापमान सामान्यपेक्षा लक्षणीयरीत्या कमी होते, उत्तर कोकणात तापमान सामान्यपेक्षा कमी होते आणि उर्वरित प्रदेशात ते सामान्य होते.
कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने सूर्यप्रकाशित हवामान राहण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत महाराष्ट्र प्रदेशातील कमाल तापमानात कोणताही बदल होणार नाही आणि त्यानंतर हळूहळू वाढ होईल. तर पुढील 24 तासांत महाराष्ट्रातील किमान तापमानात कोणताही बदल होणार नाही आणि त्यानंतर 2-3 अंश सेल्सिअसने हळूहळू वाढ होणार नाही.

महाराष्ट्रात थंडीत वाढ; आरोग्य जपा !

दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात तापमानाचा पारा आणखी खाली येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. कडाक्याच्या थंडीत आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. थंड तापमानामुळे सर्दी, खोकला, ताप आणि सांधेदुखी यांसारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे शरीर उबदार राहील अशी कपडे घालणे, गरम पाणी पिणे आणि पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे.

सकाळी कोमट पाण्याने अंघोळ करणे, वाफ घेणे आणि घरात पुरेशी हवेशीर व्यवस्था ठेवणे फायदेशीर ठरते. वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि अस्थमा किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी अतिरिक्त काळजी घ्यावी. व्यायाम करताना शरीरावर थंडीचा परिणाम होऊ नये म्हणून योग्य कपडे वापरावेत. पुरेसे पाणी पिणे आणि विश्रांती घेणेही आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.

थंडीत हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. कारण, तापमान घटल्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढतो. अशा परिस्थितीत हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे किंवा आधीपासून हृदयाचे विकार असलेल्या व्यक्तींनी खास काळजी घेणे आवश्यक आहे.