India Pakistan War! “असे काही होणार होते…, याची कल्पना होती” ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया, राजकीय नेत्यांनी काय म्हटलेय?

Astha Sutar

Donald Trump : काश्मीरमधील पहलगाम येथे काही दिवसांपूर्वी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यानंतर भारत पाकिस्तानचे संबंध ताणले गेले असून, हा हल्ला पाक पुरस्कृत असल्याचे समजले जाते. यानंतर आता भारताने पाकला धडा शिकवला पाहिजे, अशी भावना जनसामान्यांची आहे. दरम्यान, मंगळवारी रात्री भारताने पाकिस्तानमधील ९ अतिरेक्यांनी ठिकाणी उद्वस्त केली आहे. यात २६ अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला आहे. भारताने इयर स्ट्राईक करुन भारताने पाकला चोख प्रतिउत्तर दिले आहे.

दरम्यान, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ करत पाकिस्तानमधील अतिरेक्यांनी तळं उद्वस्त केली आहेत. यानंतर देशासह विदेशातूनही ‘ऑपरेशन सिंदूर’वर प्रतिक्रिया येताहेत. तसेच भारताच्या या हल्ल्यानंतर पाकिस्तान सतर्क झाला असून, याची त्यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.

याची कल्पना होती…

दुसरीकडे भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ करत पाकला जशाच तसे प्रतित्तर दिले आहे. यावरुन आता देश-विदेशातून प्रतिक्रिया समोर येत आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ करत हवाई स्ट्राईक केले आहे. यात २६ अतिरेक्यांचा खात्या करुन भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतला आहे. यानंतर “असे काही होणार होते…, याची कल्पना होती” ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

राजकीय नेत्यांनी काय म्हटलेय?

भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ करत हवाई हल्ला केला आहे. यानंतर देशातील राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “जय हिंद, भारत माता की जय!” अशी प्रतिक्रिया दिली आहे मंगळवारी रात्री पीओकेमध्ये केलेले अचूक हल्ले दहशतवादाविरुद्ध आहेत आणि दहशतवादाला आश्रय देणाऱ्या ठिकाणांवर अचूक हल्ला केल्याबद्दल भारतीय संरक्षण दलांचे कौतुक. त्यांच्यावर एवढा जोरदार हल्ला करा की, पुन्हा कधीही दहशतवादाला संधी मिळणार नाही. असं ट्विट आमदार आदित्य ठाकरेंनी केलं आहे.

ताज्या बातम्या