पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या घरापासून 20 किमीवर स्फोट, लाहोर-इस्लामाबादमध्ये भारताने मिसाइल दागले

Smita Gangurde

भारत-पाकिस्तानदरम्यान तणाव वाढला आहे. पाकिस्तानकडून सुरू असलेल्या ड्रोन आणि मिसाइल हल्ल्याचं भारतीय सैन्य सडेतोड उत्तर देत आहे. ताज्या माहितीनुसार, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किलोमीटर दूर अंतरावर ब्लास्ट झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. भारताने यापूर्वी प्रत्युत्तरात पाकिस्तानचे एअर डिफेन्स सिस्टिमसह अनेक मिसाइल उद्ध्वस्त केलं आहेत. पाकिस्तानच्या हायकेट फायटर जेट F-16 आणि जेएफ 17 ला भारतीय सैन्याने उद्ध्वस्त केलं आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवरही पाकिस्तान गोळीबार करीत आहे. ज्याचं भारत प्रत्युत्तर देत आहे.

या राज्यांना सतर्कतेचा इशारा…

भारताच्या सीमावर्ती भाग, विशेषतः राजस्थान, पंजाब आणि जम्मू आणि काश्मीर या भागाला सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भारताने पाकिस्तानला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली आहेत. दरम्यान, दिल्लीत खूप गोंधळाचं वातावरण आहे.

पाकिस्तानचा ड्रोन हल्ला हाणून पाडला…

पाकिस्तानी ड्रोन आणि क्षेपणास्त्रांद्वारे जम्मू, पठाणकोट आणि उधमपूर येथील लष्करी तळांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करण्यात आला. हे हल्ले जम्मू आणि काश्मीरमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ करण्यात आले. मात्र, भारताने पाकिस्तानचा ड्रोन हल्ला हाणून पाडला आहे.

काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील परिस्थिती खूपच तणावपूर्ण आहे. काश्मीरमधील श्रीनगर येथील संपूर्ण शहर अंधारात आहे. कुपवाडा, उरी आणि बारामुल्ला येथे पाकिस्तानकडून सतत गोळीबार सुरू आहे. भारतीय सैन्य याला चोख प्रत्युत्तर देत आहे. नियंत्रण रेषेच्या आसपासच्या सर्व शहरांमध्ये आणि गावांमध्ये, लोकांना सुरक्षित ठिकाणी आणि बंकरमध्ये जाण्यास सांगण्यात आले आहे.

ताज्या बातम्या