Operation Sindoor : भारताने पाकिस्तानला दिलं सडेतोड प्रत्युत्तर, 15 भारतीय सैन्य ठिकाणांवरील हल्ल्याचा प्रयत्न हाणून पाडला

Smita Gangurde

काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याच्या प्रत्युत्तरात भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील दहशतवादी तळ ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून उद्ध्वस्त केले. त्यानंतरही पाकिस्तानकडून कुरघोडी सुरूच होत्या. मात्र भारतीय सैन्याने सर्व हल्ले परतवून लावले. काल 7 मे रोजी रात्री पाकिस्तानने अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, जालंधर, भटिंडा, फालोदी, अमृतसर, लुधियाना, चंदीगड, उत्तरलाय, कपूरतला, आदमपूर, नाल, भूज या 13 भागात ड्रोन आणि मिसाइल हल्ले करण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र भारतीय सैन्याने काऊंटर यूएएस ग्रीड आणि एअर डिफेन्स सिस्टिमद्वारे सर्व हल्ले परतवून लावले. या हल्ल्याचे अवषेध अनेक ठिकाणी दिसत आहे, जे पाकिस्तावर केलेल्या हल्ल्याची पुष्टी करतात. न्यूज एजन्सी एनआयनं दिलेल्या वृत्तानुसार, आज सकाळी भारतीय सैन्याने पाकिस्तानाातील अनेक ठिकाणं तसंच एअर डिफेन्स रडार आणि सिस्टमनं लक्ष्य केलं होतं. भारतानं उत्तर देताना केलेल्या कारवाईत लाहोरमधील एअर डिफेन्स सिस्टम पूर्णपणे संपवली आहे. भारतीय सैन्यानं पाकिस्तानी सैन्याचा हा हल्लाचा प्रयत्न हाणून पाडलाय. रात्री सुदर्शन एस 400 या क्षेपणास्त्र रोखणाऱ्या यंत्रणेनं हा हल्ला हाणून पाडण्यात आला.

भारतावर कोठे कोठे हल्ल्याचा प्रयत्न –

१) अवंतीपुरा
२) श्रीनगर
३) जम्मू
४) पठाणकोट
५) जालंधर
६) भटिंडा
७) फालोदी
८) अमृतसर
९) लुधियाना
१०) चंदीगड
११) उत्तरलाय
१२) कपूरतला
१३) आदमपूर
१४) नाल
१५) भूज

भारताकडून ड्रोन हल्ले

ऑपरेशन सिंदूरनंतरही पाकिस्तानची आगळीक सुरुच आहे. भारतात शहरांवर हल्ल्यांचा प्रयत्न, एलओसीवर सुरु असलेला गोळीबार यात 3 भारतीयांचा मृत्यू झाला आहे. यालाच प्रत्युत्तर म्हणून भारताकडून पाकिस्तानच्या 12 शहरांत ड्रोन हल्लेही करण्यात आले. त्यात कराची, लाहोर आणि रावळपिंडीसारख्या शहरांचा समावेश आहे.

 

 

ताज्या बातम्या