पहलगाम दहशतवादी हल्ला, सलमान खान भावुक; म्हणाला, “एकही निरपराधाला मारणं म्हणजे…”

Arundhati Gadale

मुंबई : कश्मीर खोऱ्यातील पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यात पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. मागील पाच वर्षातील हा सर्वात मोठा हल्ला मानला जातो आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला सौदे अरेबियाचा दौरा आटोपत ते आज सकाळी दिल्ली दाखल झाले. दिल्ली विमानतळावर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल आणि पराराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांची त्यांनी बैठक घेतली. दरम्यान, या हल्ल्याच्या निषेध सिनेसृष्टित देखील करण्यात येत आहे. अभिनेता सलमान खान याने भावूक करणारे ट्विट या संदर्भात केले आहे.

सलमान खान याने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “काश्मीर, पृथ्वीवरील स्वर्ग आता नरकात बदलत आहे. निरपराध लोकांना टार्गेट केले जात आहे, त्यांच्या कुटुंबियांसाठी माझं मन दुःखी आहे. एकही निरपराध व्यक्तींची हत्या म्हणजे संपूर्ण सृष्टीचं मरण आहे.

शाहरुख खानने व्यक्त केल्या सहवेदना

सलमान खानसोबतच शाहरुख खान याने देखील पहलगाममधील हल्ल्याचा निषेध केला आहे. त्याने ट्विट करत म्हटले आहे, ‘पहलगाममध्ये घडलेल्या विश्वासघातकी आणि अमानवीय हिंसाचाराबद्दलचे दुःख आणि संताप शब्दात व्यक्त करता येत नाही.पीडित कुटुंबांसाठी प्रार्थना करू शकतो आणि माझ्या तीव्र संवेदना व्यक्त करतो. एक राष्ट्र म्हणून आपण एकजूट, मजबूत उभे राहू आणि या घृणास्पद कृत्याविरुद्ध न्याय मिळवू.’

सनी देओल, अक्षय कुमारकडून निषेध

पहलगाममधील हल्ल्याचा बाॅलिवूड स्टार सनी देओल, अक्षय कुमार यांनी देखील निषेध केला आहे. अक्षय कुमार म्हटला आहे की, पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याची बातमी ऐकुण वाईट वाटले. निष्पाप लोकांना मारणे हे निंदणीय आहे. पीडित कुटुंबीयांच्या दुख:त मी सहभागी आहे. तर, सनी देओल याने म्हटले आहे की, दहशतवाद मुळापासून संपवण्याची वेळ आली आहे. पीडित कुटुंबांसोबत माझ्या सहवेदना आहे.

 

ताज्या बातम्या