MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

IPLची फायनल उद्या अहमदाबादमध्ये, विमानाचं तिकीट 25 हजारांच्या पार; स्टेडियममधील तिकिटांची विक्री पाहून चक्रावाल!

Written by:Smita Gangurde
आयपीएलची फायनल मंगळवारी अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे क्रिकेट प्रेमींमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

अहमदाबाद – आयपीएलची फायनल मंगळवारी अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. फायनलच्या क्लोझिंग सेरेमनची थीम ऑफरेशन सिंदूर असणार आहे. या कार्यक्रमात भारतीय तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांना निमंत्रण देण्यात आलंय. मात्र तिन्ही सैन्यदल प्रमुख येणार का, याबाबत अद्याप स्पष्टता आलेली नाही. नरेंद्र मोदी स्टेडियम तिरंग्याच्या रंगानं सजवण्यात येणार आहे. यावेळी गायक शंकर महादेवन यांचा लाईव्ह कॉन्सर्टही पार पडणार आहे.

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर फायनल होत असल्यानं सोमवारी आणि मंगळवारची अहमदाबादला जाणाऱ्या विमानांची तिकिटं चांगलीच महागली आहेत. अहमदाबादला जाणाऱ्या विमानांची तिकिटं 25 हजारांच्या घरात पोहचली आहेत. साधारणपणे साडे तीन, चार हजारांच्या घरात असलेलं भाडं एकदम 25 हजारांपर्यंत पोहचलंय.

नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणाऱ्या फायनलसाठी 80 हजार तिकिटांची विक्री झालेली आहेत. या स्टेडियममधील दर्शकांची संख्या 1.32 लाख इतकी आहे. 25 हजार तिकिटं राखीव ठेवण्यात आली आहेत.

समारोप समारंभ सैनिकांना समर्पित

आयपीएलच्या समारोपाच्या निमित्तानं भारतीय सैन्यदलाला त्यांच्या साहसाला आणि शौर्याला सलामी देण्यात येणार आहे. त्यामुळे हा समारोप सोहळा सैन्यदलाला समर्पित करण्याचा आणि खऱ्या नायकांचा सन्मान करण्याचा निर्णय बीसीसीआयनं घेतल्याचं सांगण्यात आलंय. क्रिकेट हे राष्ट्रीय वेड असलं, तरी देशाची अखंडता, एकात्मता आणि सुरक्षततेच्या पलिकडे काहीही नसल्याचा संदेशही या निमित्तानं देण्यात येणार आहे.

अहमदाबादमधील मेट्रो रात्री उशिरापर्यंत धावणार

3 मार्चला आयपीएलची फायनल असल्यानं शहरातील वाहतुकीवरही मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. क्रिकेट रसिकांना मॅच संपल्यानंतर घरी, हॉटेलांवर परतण्यासाठी मेट्रोची वेळ वाढवण्यात आलेली आहे. रात्री 12.30 पर्यंत अहमदाबादमधील मेट्रो उद्या सुरु राहणार आहेत. तरचं महापालिकेच्या वतीनं रात्री उशिरापर्यंत जादा बस सोडण्याचा निर्णयही घेण्यात आलाय.