Rashi Bhavishya In November : नोव्हेंबरमध्ये या 3 राशींच्या लोकांना अच्छे दिन; नुसता पैसाच पैसा

ज्योतिष शास्त्रातून नोव्हेंबर महिना विशेष महत्त्वाचा ठरेल कारण या महिन्यात अनेक प्रमुख ग्रहांच्या हालचाली बदलतील

ऑक्टोबर महिना संपत आला असून नोव्हेंबरला सुरुवात होणार आहे. ज्योतिष शास्त्रातून नोव्हेंबर महिना (Rashi Bhavishya In November) विशेष महत्त्वाचा ठरेल कारण या महिन्यात अनेक प्रमुख ग्रहांच्या हालचाली बदलतील. २ नोव्हेंबर रोजी चंद्र मीन राशीत संक्रमण करेल आणि त्याच दिवशी शुक्र तूळ राशीत प्रवेश करेल. शिवाय, १० नोव्हेंबर रोजी बुध वृश्चिक राशीत वक्री होईल. ११ नोव्हेंबर रोजी गुरु कर्क राशीत वक्री होईल. १६ नोव्हेंबर रोजी सूर्य वृश्चिक राशीत प्रवेश करेल. २३ नोव्हेंबर रोजी बुध तूळ राशीत संक्रमण करेल आणि २९ नोव्हेंबरपर्यंत या राशीत वक्री राहील. नोव्हेंबरच्या अखेरीस शनि देखील मीन राशीत थेट वळेल. तर, नोव्हेंबरमधील या ग्रहांच्या हालचालीचा फायदा 3 राशींना होणार आहे

1) तुळ राशी

तूळ राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर महिना अतिशय अनुकूल राहील. मागील काही दिवसापासून रक्कडलेली तुमची कामे नोव्हेंबर मध्येच सुराला लागतील. कौटुंबिक वातावरण अत्यंत सकारात्मक राहील. अविवाहित लोकांची लग्न जमण्याची शक्यता आहे तसेच जुने प्रेम पुन्हा एकदा मिळू शकते. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने हा काळ अतिशय उत्तम असेल. आत्मविश्वास वाढवण्यासाठी आणि स्वतःवर मेहनत घेण्यासाठीचा हा काळ नक्कीच तुळ राशीच्या लोकांचे आयुष्य बदलवणारा ठरेल.

2) वृश्चिक Rashi Bhavishya In November 

वृश्चिक राशीच्या लोकांना नोव्हेंबर महिन्यात बाहेर कुठेतरी फिरण्याचा योग सुरू देऊ शकतो. वैवाहिक जीवन गोड होईल आणि जुने मतभेद दूर होतील. नोव्हेंबर महिन्यात पैशाची कोणती अडचण जाणवणार नाही, उलट उत्पन्नाचे नवनवीन स्त्रोत उपलब्ध होतील. नोकरीच्या ठिकाणी बढती मिळेल आणि साहजिकच त्यामुळे पगारवाढ होईल. समाजात मान सन्मान मिळेल. एकूणच काय तर सर्व ग्रहांचे भ्रमण वृश्चिक राशीच्या लोकांना अतिशय फायद्याचे ठरेल. Rashi Bhavishya In November

3) कुंभ

नोव्हेंबरमध्ये होणारे ग्रह बदल कुंभ राशीच्या लोकांसाठी खूप खास मानले जाईल. तुम्हाला या महिन्यात नवनवीन संधी मिळतील, ज्या तुमच्या करिअरच्या दृष्टीने गेमचेंजर ठरतील. व्यावसायिक लोकांसाठी नोव्हेंबर महिन्यात नवीन प्रोजेक्ट मिळतील. उत्पन्नात वाढ होईल. तुम्हाला तुमच्या पालकांकडून पाठिंबा मिळेल. तुमचे आरोग्य सुधारेल. मानसिक स्थिरता देखील वाढेल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News