ठाणे शहर आणि परिसरात 4 दिवसांसाठी 50% पाणीकपात; जलवाहिनी दुरूस्तीच्या कामांमुळे निर्णय

ठाणे शहरात मुख्य जलवाहिनी बिघडल्याने १५ डिसेंबर २०२५ पर्यंत ५०% पाणी कपात लागू राहणार आहे. यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा येथील लाखो नागरिकांवर परिणाम होणार आहे.

पाणीकपातीमुळे नागरिकांची डोकेदुखी नेहमीच वाढत असते. अशा परिस्थितीत ठाणेकरांसाठी डोकेदुखी वाढवणारी अशी एक बातमी समोर आली आहे. कारण, ठाणे शहर आणि परिसरात 4 दिवसांसाठी पाणीकपात असणार आहे. ठाणे शहरात मुख्य जलवाहिनी बिघडल्याने १५ डिसेंबर २०२५ पर्यंत ५०% पाणी कपात लागू राहणार आहे. यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा, दिवा येथील लाखो नागरिकांवर परिणाम होणार आहे.

ठाणे शहरात 4 दिवसांसाठी पाणीकपात

ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीमध्ये बिघाड झाला आहे. त्यामुळे ठाणे शहरात लागू करण्यात आलेली ५० टक्के पाणी कपात आणखी चार दिवस म्हणजेच १५ डिसेंबर २०२५ पर्यंत कायम राहणार आहे, अशी माहिती महापालिकेने दिली आहे. यामुळे ठाणे, कळवा, मुंब्रा, आणि दिवा येथील लाखो नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचे पाहायला मिळत आहे. नागरिकांना पाण्याचा अत्यंत जपून वापर करावा, असे कळकळीचे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे.

पाणीकपातीचे कारण नेमकं काय ?

ठाणे शहराच्या पाणीपुरवठ्याचे मुख्य स्त्रोत असलेल्या पिसे बंधारा येथून पाणी टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे आणले जाते. मात्र कल्याण फाटा येथे महानगर गॅस कंपनीच्या कामादरम्यान १००० मि.मि. व्यासाची मुख्य जलवाहिनी दुसऱ्यांदा नादुरुस्त झाली. पाणीपुरवठा विभागाने तातडीने दुरुस्ती सुरू केली असली तरी ही जलवाहिनी जुनी असण्यासोबतच प्रिस्ट्रेस काँक्रिट (Prestressed Concrete – PCCP) पद्धतीची आहे.

पीसीसीपी जलवाहिनीची दुरुस्ती क्लिष्ट आणि वेळखाऊ असते. कारण दुरुस्तीसाठी विशेष पद्धती आणि वेळ आवश्यक असतो. याच कारणामुळे दुरुस्ती पूर्ण होण्यासाठी आणखी चार दिवसांचा कालावधी लागणार आहे. ही दुरुस्ती संपेपर्यंत म्हणजे १५ डिसेंबरपर्यंत शहराच्या पाणीपुरवठ्यात ५० टक्के घट राहील.

नागरिकांनी पाणीसाठा करण्याचे आवाहन

या काळात नागरिकांनी आपल्या घरगुती गरजेपुरता पाणीसाठा करून ठेवावा, असे आवाहन खरंतर महापालिकेकडून करण्यात आले आहे. खरंतर अशा दुरूस्तीच्या कामांमुळे नागरिकांना बहुतांश वेळा मनस्ताप सहन करावा लागत असतो. त्यामुळे या काळात आवश्यक पाणीसाठी केला जाईल, याची खबरदारी नागरिकांनी घेणे अत्यंत आवश्यक आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News