Vastu Tips : आंघोळीनंतर लगेच करू नका ‘ही’ काम, काय सांगते शास्त्र? जाणून घ्या…

वास्तुनुसार, आंघोळीनंतर लगेच काही काम केल्याने नकारात्मक परिणाम होऊ शकतात. अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या अंघोळ झाल्यावर करू नये. याबद्दल जाणून घेऊयात...

वास्तुशास्त्रानुसार, आंघोळीनंतर काही गोष्टी अशा असतात ज्या लगेच करू नये. किंवा ती कामे करणे टाळावे. अन्यथा त्याचा प्रभाव हा आपल्या ग्रहांवर आणि परिणामी आपल्या आयुष्यावरही होऊ शकतो. त्यामुळे अशी कोणती कामे आहते जी अंघोळीनंतर करू नये जाणून घेऊयात….

लगेच स्वयंपाकघरात जाऊ नका

आंघोळ केल्यानंतर लगेच स्वयंपाकघरात जाणे किंवा स्वयंपाक करणे अशुभ मानले जाते. आंघोळीनंतर मन शुद्ध असते, त्यामुळे लगेच उष्णता असलेल्या स्वयंपाकघरात जाणे अशुभ मानले जाते, जे ग्रहांच्या संतुलनावर परिणाम करते.

आरशात पाहणे

वास्तुशास्त्रानुसार, आंघोळीनंतर लगेच आरशात पाहणे टाळावे. आंघोळीनंतर लगेच आरशासमोर उभे राहू नये, यामुळे नकारात्मक ऊर्जा आकर्षित होऊ शकते असे मानले जाते. आंघोळीनंतर शरीर संवेदनशील असते. या वेळेस आरशात पाहिल्यास ऊर्जा शोषली जाते किंवा परावर्तित होते, ज्यामुळे मानसिक अस्वस्थता वाढते. शुक्र आणि चंद्राचा नकारात्मक प्रभाव पडू शकतो, असे वास्तुशास्त्र सांगते.

झाडू मारणे टाळा

आंघोळीनंतर लगेच झाडू मारल्यास सकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि शनि दोष वाढतो, असे मानले जाते. आंघोळीनंतर लगेच झाडू मारल्यास घरातली सकारात्मक ऊर्जा बाहेर फेकली जाते आणि घरातील लक्ष्मी निघून जाते, असे मानतात. यामुळे शनि दोष वाढू शकतो.

तामसिक अन्न टाळणे

आंघोळ झाल्यावर लगेच झोपणे वास्तुशास्त्रानुसार अयोग्य मानले जाते. आंघोळ झाल्यावर लगेच कांदा, लसूण किंवा मांसाहार खाऊ नये, यामुळे नकारात्मक ऊर्जा वाढते आणि आरोग्यावर वाईट परिणाम होतो. आंघोळ ही शुद्धीकरणाची क्रिया आहे आणि त्यानंतर लगेचच सकारात्मक आणि शुद्ध गोष्टी करणे महत्त्वाचे आहे. कांदा, लसूण आणि मांसाहार हे तामसिक मानले जातात, म्हणून ते टाळण्याचा सल्ला दिला जातो.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News