Shri Krishna Mantra : सकासकाळी म्हणा श्रीकृष्णाचे हे मंत्र; सगळी नकारात्मकता दूर होईल

श्रीकृष्णाला भक्तांचे दुःख दूर करणारे आणि त्यांचे जीवन आनंदाने भरणारे भगवान मानले जाते. त्यांचे स्मरण केल्याने मानसिक ताण कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते

सकाळचे वातावरण हे अध्यात्मिक दृष्ट्या अतिशय अनुकूल असते. अशावेळी देवाचे मंत्र किंवा जप म्हटल्याने दिवसाची सुरुवात उत्तम होते असं म्हटलं जातं .तसेच आपल्याला मानसिक शांती सुद्धा लाभते. सकारात्मकतेने दिवसाची सुरुवात सकाळची वेळ बेस्ट असते. तुम्ही जर भगवान श्रीकृष्णाचे भक्त असाल तर आज आम्ही तुम्हांला असे काही मंत्र (Shri Krishna Mantra) सांगणार आहोत जे सकाळी भल्या पहाटे म्हटल्याने तुमचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाईल. भक्तांचा असा विश्वास आहे की हे पवित्र मंत्र जीवनातील अडचणी दूर करतात आणि दैवी संरक्षणाची भावना देतात.

श्रीकृष्ण मंत्रांचा जप करण्याचे महत्त्व

श्रीकृष्णाला भक्तांचे दुःख दूर करणारे आणि त्यांचे जीवन आनंदाने भरणारे भगवान मानले जाते. त्यांचे स्मरण केल्याने मानसिक ताण कमी होतो आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. विशेषतः सकाळी जप केल्याने मन, बुद्धी आणि आत्मविश्वास बळकट होतो. (Shri Krishna Mantra)

सकाळी या श्रीकृष्ण मंत्रांचा जप करावा

सकाळी आंघोळ केल्यानंतर शांत मनाने खालील मंत्रांचा जप करा.

“ओम नमो भगवते वासुदेवाय”

हा मंत्र मनाची शांती आणि आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करतो.

“हरे कृष्ण हरे कृष्ण, कृष्ण कृष्ण हरे हरे.

हरे राम हरे राम, राम राम हरे हरे.”

हा महामंत्र जीवनात आनंद, प्रेम आणि सकारात्मकता वाढवणारा मानला जातो.

“कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्माने.

प्राणथ क्लेष्णाय गोविंदाय नमो नमः.”

दुःख दूर करण्यासाठी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी विशेषतः फायदेशीर ठरतो

“गोविंदम गोपालम गीता सारम जगत्पतिम.”

ज्ञान आणि बुद्धी विकसित करणारा मंत्र.

मंत्र जप करण्याचे फायदे Shri Krishna Mantra 

मंत्र जप केल्याने मला मानसिक शांती लाभते.
नकारात्मक विचार दूर होतात
करिअर आणि अभ्यासात एकाग्रता वाढते
भीती कमी होते आणि श्रद्धा वाढते
कुटुंबात आनंद आणि सुसंवाद वाढतो

मंत्र जप करण्यासाठीचे नियम

मंत्र जप करत असताना आपण ज्या ठिकाणी बसतोय ती जागा स्वच्छ असावी. त्याठिकाणचे वातावरण शांत असावे जेणेकरून तुमचं संपूर्ण लक्ष्य देवाकडे केंद्रित होईल.

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News