Dev Uthani Ekadashi Katha : देवप्रबोधिनी एकादशी जाणून घ्या महत्त्व आणि व्रत कथा

दिवाळीनंतर प्रबोधिनी एकादशी साजरी केली जाते. हिंदू धर्मात प्रबोधिनी एकादशी विशेष महत्त्व आहे.

देवप्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या निद्रेतून जागे होतात, त्यामुळे या दिवसाला देवउठनी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी चातुर्मास संपतो आणि शुभ कार्यांची सुरुवात होते. या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केल्याने सर्व पापे आणि दुःखे दूर होतात, असे मानले जाते. या दिवसानंतर शुभ कार्य आणि लग्नसराईला सुरुवात होते. असे म्हटले जाते या दिवशी उपवास करुन भगवान विष्णूची आराधना केल्याने जीवनातील अनेक पापे नष्ट होतात तसेच दु:ख देखील दूर होते. जाणून घेऊया या एकादशीची कथा…

देवप्रबोधिनी एकादशीचे महत्त्व

देवप्रबोधिनी एकादशी (देवउठनी एकादशी) हे कार्तिक महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशीला साजरे केले जाते, ज्याचे हिंदू धर्मात विशेष महत्त्व आहे. या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या निद्रेतून जागे होतात, त्यामुळे चातुर्मास संपतो आणि त्यानंतर शुभ कार्यांना सुरुवात होते. या दिवशी उपवास आणि विष्णूची विशेष पूजा केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि सुख-समृद्धी वाढते असे मानले जाते. या दिवशी श्री विष्णूची विशेष पूजा करण्याचे महत्त्व आहे आणि या व्रताचे पालन करणाऱ्या भक्ताला सुख-समृद्धी प्राप्त होते.

देवप्रबोधिनी एकादशी व्रत कथा

पौराणिक कथेनुसार, एका राजाच्या राज्यातील सर्वजण एकादशीचे व्रत करत असत. या दिवशी लोकांपासून ते जनावरांपर्यंत कोणालाही अन्न दिले जात नव्हते. एके दिवशी दुसऱ्या राज्यातील एक व्यक्ती राजाकडे आली आणि म्हणाला, महाराज ! कृपया मला कामावर घ्या. तेव्हा राजाने त्याच्यापुढे एक अट घातली की, ठीक आहे, तुला कामावर ठेवू. पण रोज तुम्हाला जेवायला सगळं मिळेल, पण एकादशीला जेवण मिळणार नाही.

त्यावेळी त्या व्यक्तीने अट मान्य करत ‘हो’ म्हटले, पण एकादशीच्या दिवशी त्याला जेव्हा फराळ देण्यात आला तेव्हा तो राजासमोर जाऊन विनवणी करू लागला की, महाराज ! याने माझे पोट भरणार नाही. मी भुकेने मरेन, असे म्हणत तो खायला मागू लागला. यावर राजाने त्याला नोकरी मागतांना सांगितलेली अट अठवण करुन दिली मात्र, तरी देखील तो अन्न सोडण्यास तयार झाला नव्हता. त्याची मानसिकता लक्षात घेत राजाने त्याला पीठ, डाळी, तांदूळ इत्यादी दिले आणि हे साहित्य घेऊन तो नेहमीप्रमाणे नदीवर पोहोचला आणि आंघोळ करून अन्न शिजवू लागला. जेवण तयार झाल्यावर त्याने देवाला आवाहन केले.
त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत श्रीकृष्ण चतुर्भुज रूपात पितांबर परिधान करून आले आणि प्रेमाने त्याच्यासोबत भोजन करू लागले. भोजनानंतर देव अंतर्धान पावले आणि तो आपल्या कामावर निघून गेला. त्यानंतर, 15 दिवसांनी पुढच्या एकादशीला ती व्यक्ती पून्हा राजाला म्हणू लागली, महाराज आज मला भोजनासाठी दुप्पट सामान द्या. त्या दिवशी मी उपाशी राहिलो. यावर राजाने कारण विचारले असता त्याने सांगितले की, त्या दिवशी देवाने देखील माझ्यासोबत जेवन केले. त्यामुळे भोजन अपूरे पडले. त्यामुळे आम्हा दोघांना पूरेल इतक सामान द्याव.
हे ऐकून राजाला फार आश्चर्य वाटले. तो म्हणाला देव तुझ्यासोबत जेवण करतो यावर माझा विश्वास बसत नाही. मी खूप व्रत आणि उपासना पाळतो, पण देव मला कधीच दिसला नाही. हे सर्व ऐकून राजाला अश्चर्य वाटले आणि राजा म्हणाला, मी मान्य नाही करु शकत की तुझ्यासोबत देवाने भोजन केले असेल. मी इतके व्रत करतो पण मला कधी देवाचे दर्शन झाले नाही.
राजाचे हे बोलणे ऐकून तो व्यक्ती म्हणाला की, महाराज तुम्हाला विश्वास नसेल तर या आणि प्रत्यक्ष बघा. त्यानुसार, राजा झाडामागे लपून बसला. त्या व्यक्तीने नेहमीप्रमाणे जेवण तयार केले आणि देवाचे आवाहन केले. संध्याकाळपर्यंत देवाला हाक मारली, तरीही देव प्रकट झाले नाही. शेवटी तो व्यक्ती म्हणाला- अरे देवा! तू आला नाहीस तर मी नदीत उडी मारून जीव देईन.
आवाहन करुन देखील देव दर्शन देत नसल्याचे लक्षात घेत तो जीव देण्यासाठी नदीकडे निघाला. प्राणाची आहुती देण्याचा त्याता विचार लक्षात घेत देव त्याच्या समोर प्रकट झाले आणि त्याला आत्महत्येपासून रोखत त्यांनी एकत्र बसून जेवण केले. त्यानंतर, देवाने त्या व्यक्तीला त्याच्या घरी सोडले. हे पाहून राजाने विचार केला की मन शुद्ध असल्याशिवाय व्रतचा फायदा नाही. त्यानंतर, राजाने मनोभावाने हे व्रत कराण्यास सुरुवात केली. या व्रताच्या प्रभावाने राजाला ज्ञान आणि स्वर्गप्राप्ती झाली.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)

About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News