एकादशी अन् दुप्पट खाशी ही म्हण तर तुम्ही ऐकलीच असेल. म्हणूनच प्रत्येकजण या दिवशी उपवासाचे पदार्थ मनसोक्त खातो. अशावेळी काय खावे किंवा आहार कसा असावा हा सगळ्यात मोठा प्रश्न गृहीणींसमोर उभा राहतो. जास्त विचार करू नका. आम्ही खास रेसिपी घेऊन आलो आहोत कच्या केळीचे चिप्स . चला तर मग जाणून घेऊया कच्या केळीचे चिप्स कसे बनवायचे …
साहित्य
- कच्ची केळी
- नारळाचे तेल
- सेंधा नमक
- काळी मिरी पावडर (ऐच्छिक)
कृती
- केळी सोलून घ्या आणि पातळ चकत्या करा.
- एका कढईत नारळाचे तेल गरम करा.
- तेलात केळीच्या चकत्या सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्या.
- तळलेले चिप्स काढून घ्या आणि जास्तीचे तेल निथळण्यासाठी पेपर टॉवेलवर ठेवा.
- चिप्स गरम असताना त्यावर सेंधा नमक आणि काळी मिरी पावडर भुरभुरा.
- उपवासाच्या दिवशी खाण्यासाठी कुरकुरीत केळी चिप्स तयार आहेत.












