Dev Uthani Ekadashi 2025 : उपवासाला बनवा साबुदाण्याचे खमंग थालीपीठ

साबुदाण्यापासून अनेक प्रकारच्या पाककृती बनवता येतात. उपवासाच्या व्यतिरिक्त तुम्ही केव्हाही खाण्यासाठी साबुदाणा थाळीपीठ बनवू शकता.

उपवास म्हंटल कि आपल्या प्रत्येकाच्या घरात साबुदाणा खिचडी बनवलेली असते. त्यात साबुदाणा खिचडी ही आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला आवडीची डिश आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना साबुदाणा खिचडी आवडते. कारण साबुदाण्यापासून विविध प्रकारचे पदार्थ बनवले जात असून या बनवलेल्या पदार्थांची स्वतःची एक वेगळीच चव असते. आज आम्ही तुम्हाला साबुदाणा थाळीपीठाची रेसिपी सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया साबुदाणा थाळीपीठ कसे बनवायचे…

साहित्य

  • साबुदाणा
  • शेंगदाणे
  • उकडलेले बटाटे
  • शिंगाड्याचे पीठ
  • जीरा
  • काळी मिरी पूड
  • किसलेले आले
  • हिरवी मिरची बारीक चिरलेली
  • कोथिंबीर
  • लिंबाचा रस
  • तेल
  • सेंधव मीठ

कृती

  • सर्वप्रथम साबुदाणा स्वच्छ धुवून ४-५ तास पाण्यात भिजत ठेवावा. यामुळे साबुदाणा मऊ होईल आणि चांगला फुलून जाईल.
  • आता एका कढईत शेंगदाणे घालून चांगले भाजून घ्या. यानंतर चांगले भाजल्यानंतर त्यांना एका भांड्यात काढून घ्या.
  • भाजलेले शेंगदाणे थंड झाल्यावर त्यांची सालं काढून घ्या. त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यात हे शेंगदाणे घेऊन थोडे बारीक वाटून घ्या.
  • यानंतर उकडलेले बटाटे मॅश करून बारीक केले शेंगदाणे पूड घालावे. दोन्ही चांगले मिक्स करा. त्यानंतर या मिश्रणात जिरे, काळी मिरी पावडर घालून मिक्स करावे.
  • नंतर मिश्रणात किसलेले आले, हिरवी कोथिंबीर आणि मीठ घालून छान मिक्स करावे. आता मिश्रणात एक कप शिंगाड्याचे पीठ घालून सर्व साहित्य नीट मळून घ्या.
  • थाळीपीठ करण्यासाठी पीठ तयार झाले आहे. आता एक बटर पेपर घेऊन त्याला थोडे तेल लावा जेणेकरून थाळीपीठ करताना चिकटणार नाही.
  • यानंतर पीठाचा एक मोठा गोळा घेऊन बटर पेपरवर हाताच्या बोटाच्या साहाय्याने गोलाकार पद्धतीने थापून घ्या.
  • थाळीपीठ जास्त पातळ नसावे, कारण थाळीपीठ खूप पातळ आल्यास भाजताना करपू शकत किंवा भाजून झाल्यावर कडक देखील होऊ शकत.
  • आता मध्यम आचेवर तवा गरम करा. तवा गरम झाल्यावर त्यात थोडं तेल घालून सगळीकडे पसरवा.
  • यानंतर साबुदाणा थाळीपीठ घालून मध्यम आचेवर भाजून घ्या. आता थाळीपीठ हळूहळू दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्या.
  • त्यानंतर एका प्लेटमध्ये तयार झालेले थाळीपीठ काढून घ्या. अश्या पद्धतीने सगळे थाळीपीठ तयार करून घ्या. त्यानंतर पुदिन्याची चटणी किंवा दह्याबरोबर सर्व्ह करा.

 


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News