Kartiki Ekadashi 2025 Wishes : कार्तिकी एकादशीनिमित्त आपल्या प्रियजणांना द्या “या” शुभेच्छा…

दिवाळी झाली की कार्तिकी एकादशीसाठी तयारी सुरू होते. यादिवशी तुळशी विवाह देखील साजरा होतो. कार्तिकी एकादशी निमित्त आपल्या प्रियजणांना द्या या शुभेच्छा.

कार्तिकी एकादशी हा दिवस प्रबोधिनी एकादशी, देवउठणी एकादशी म्हणून देखील ओळखला जातो. आषाढ महिन्यातील देवशयनी एकादशीला भगवान विष्णू योगनिद्रेत जातात आणि देवउठनी एकादशीला जागे होतात. या कालावधीत शुभ कार्ये थांबवलेली असतात. या एकादशीच्या दिवसापासून पुन्हा विवाह, गृहप्रवेश इत्यादींसारखी सर्व शुभ कार्ये सुरू होतात. दिवाळी झाली की कार्तिकी एकादशीसाठी तयारी सुरू होते. यादिवशी तुळशी विवाह देखील साजरा होतो. कार्तिकी एकादशी निमित्त आपल्या प्रियजणांना द्या या शुभेच्छा….

देवउठनी एकादशीचे महत्त्व

देवउठनी एकादशीचे महत्त्व हे आहे की या दिवशी चार महिन्यांच्या निद्रेतून भगवान विष्णू जागे होतात, ज्यामुळे चातुर्मासाची समाप्ती होते आणि सर्व शुभ व मांगलिक कार्ये पुन्हा सुरू होतात.  या दिवशी भगवान विष्णू चार महिन्यांच्या ‘योगनिद्रे’तून बाहेर येतात, त्यामुळे याला ‘प्रबोधिनी एकादशी’ असेही म्हणतात. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने सर्व पापांचा नाश होतो आणि कुटुंबात सुख-समृद्धी येते.

कार्तिकी एकादशी शुभेच्छा संदेश

ताल वाजे, मृदूंग वाजे, वाजे हरीचा वीणा !!
माउली निघाले पंढरपूर, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला !!
!! जय जय राम कृष्ण हरी !!
कार्तिकी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा!

युगे अठ्ठावीस विटेवरी उभा
वामांगी रखुमाईदिसे दिव्य शोभा
प्रबोधिनी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा!

भिडे आसमंती ध्वजा वैष्णवांची,
उभी पंढरी आज नादावली
तुझे रुप ओठी तुझे रुप ध्यानी
जीवाला तुझी आस का लागली
प्रबोधिनी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा!

तूझा रे आधार मला, तूच रे पाठिराखा
तूच रे माझ्या पांडुरंगा, चूका माझ्या देवा
घे रे तुझ्या पोटी, तुझे नाम ओठी सदा राहो
कार्तिकी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा!

पंढरीची वारी जयाचिये कुळी
त्याची पायधुळी लागो मन
प्रबोधिनी एकादशीच्या
विठू भक्तांना हार्दिक शुभेच्छा!

सुख दु:ख अंतरीचे घे विठ्ठला विश्वाची तूच घेसी,
मनाच्या विटाळा चंदनाचा लेप देहाची पंढरी तूच करीशी ।।
कार्तिकी एकादशीच्या सर्वांना शुभेच्छा!

सावळे सुंदर रूप मनोहर ।
राहो निरंतर हृदयी माझे ।।
कार्तिकी एकादशीच्या भक्तीमय शुभेच्छा!

पाणी घालतो तुळशीला
वंदन करतो देवाला
सदा आनंदी ठेव माझ्या कुटुंबाला
हीच प्रार्थना करतो पांडुरंगाला||
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!

विठ्ठल नामाची शाळा भरली
शाळा शिकताना तहान भूक हरली रे
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी|
कर कटावरी ठेवोनियां||
कार्तिकी एकादशीच्या शुभेच्छा!

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News