भगवान विष्णू ज्यांना जगाचा तारणहार म्हणून ओळखले जाते. भगवान विष्णूची अशी काही मंदिरे आहेत, जिथे केवळ दर्शन केल्याने भक्तांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात आणि जीवनातील दुःखांपासून मुक्ती मिळते. चला जाणून घेऊया भगवान विष्णूच्या अशा चमत्कारिक मंदिरांबद्दल…
रंगनाथ स्वामी मंदिर- तामिळनाडू
बद्रीनाथ धाम- उत्तराखंड
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर- महाराष्ट्र
महाराष्ट्रातील पंढरपूरचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे भक्तांच्या इच्छेसाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर ‘महाराष्ट्राचे आराध्य दैवत’ आणि ‘वारकरी संप्रदायाचे आराध्य दैवत’ म्हणून ओळखले जाते. या मंदिरात भाविकांना देवाच्या चरणांना स्पर्श करून दर्शन घेण्याची संधी मिळते, जे या मंदिराचे एक खास वैशिष्ट्य आहे. आषाढी आणि कार्तिकी एकादशीला येथे लाखो भाविक गर्दी करतात. हे महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर शहरात आहे. हे मंदिर विठ्ठल आणि रुक्मिणी, भगवान विष्णूचे एक रूप आहे असे मानले जाते.
तिरुपती व्यंकटेश्वर मंदिर- तिरुपती
तिरुपती हे आंध्र प्रदेशातील चित्तूर जिल्ह्यात स्थित बालाजीचे जगप्रसिद्ध मंदिर आहे. तिरुपती बालाजीचे खरे नाव श्री व्यंकटेश्वर स्वामी असे आहे. देशातील सर्वात श्रीमंत मंदिरांमध्ये याची गणना होते. भारतातील सर्वात प्रसिद्ध तीर्थक्षेत्रांपैकी एक, तिरुपती वेंकटेश्वर मंदिर तिरुपतीजवळील तिरुमला टेकडीवर वसलेले आहे. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भगवान व्यंकटेशाच्या दर्शनासाठी येतात.












