उपवासाच्या दिवशी आहारात मोजक्याच पदार्थांचे सेवन केले जाते. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा किंवा वरीच्या तांदळाचा भात आणि शेंगदाण्याची आमटी बनवून खाल्ली जाते. मात्र नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये रताळ्याची खीर बनवू शकता. चला तर जाणून घेऊया रताळ्याची खीर बनवण्याची सोपी रेसिपी…
साहित्य
- १ कप रताळे (उकडून मॅश केलेले)
- २ कप दूध
- १/२ कप साखर (आवडीनुसार)
- १/२ चमचा वेलची पावडर
- १/४ कप ड्राय फ्रुट्स (बदाम, काजू, बेदाणे)
- १ चमचा तूप
कृती
- एका पातेल्यात पाणी घेऊन ते गॅसवर उकळायला ठेवायचं. त्यावर एक जाळी ठेवून त्यामध्ये रताळी स्वच्छ धुवून ठेवायची. वरुन झाकण ठेवले किंवा नाही ठेवले तरी चालेल.
- अगदी ५ मिनीटांत ही रताळी मस्त शिजतात. काटा चमच्याने त्यााल टोचे देऊन शिजली की नाही हे तपासायचे. मग काही वेळ ती गार होऊ द्यायची आणि त्याची साले काढायची.
- किसणीने ही रताळी चांगली किसून घ्यायची.
- एका जाड बुडाच्या भांड्यात दूध गरम करा.
- दूध थोडे घट्ट झाल्यावर त्यात साखर आणि मॅश केलेले रताळे घाला.
- मिश्रण ढवळत राहा आणि ते व्यवस्थित मिसळेपर्यंत शिजवा.
- आता त्यात वेलची पावडर आणि ड्राय फ्रुट्स घाला.
- १-२ मिनिटे मंद आचेवर शिजवून गॅस बंद करा.
- गरमागरम किंवा थंडगार रताळ्याची खीर सर्व्ह करा.












