Kartiki Ekadashi 2025 : कार्तिकी एकादशीनिमित्त उपवासाला करा शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू

उपवासाच्या दिवशी कायमच साबुदाणे खाल्ले जातात. पण आज आम्ही तुम्हाला शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू बनवण्याची सोपी रेसिपी सांगणार आहोत.

कार्तिक महिना आला की कार्तिकी एकादशीची ओढ लागते. एकादशीनिमित्त अनेक जण उपवास देखील करतात. दिवसभर काही न खाता-पीता श्रद्धेने एकादशीचा उपवास केला जातो. कार्तिकी एकादशीनिमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू. चला तर जाणून घेऊया शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू बनवण्याची सोपी रेसिपी

साहित्य

  • शेंगदाणे (शेंगदाण्याची डाळ)
  • गूळ
  • तूप

कृती

  • शेंगदाणे मंद आचेवर चांगले खरपूस भाजून घ्या.
  • शेंगदाणे थोडे थंड झाल्यावर त्यांची साल काढून टाका.
  • शेंगदाण्याची डाळ मिक्सरमधून फिरवून थोडी जाडसर पावडर बनवा. एकदम बारीक पीठ करू नका.
  • कढईत शेंगदाण्याच्या जाडसर पावडरमध्ये गूळ घालून मंद आचेवर मिक्स करा.
  • गूळ विरघळायला लागल्यावर त्यात तूप घाला आणि मिश्रण एकजीव होईपर्यंत शिजवा.
  • मिश्रण थोडे कोमट झाल्यावर हाताला तूप लावून त्याचे लाडू वळा.
  • लाडू थंड झाल्यावर घट्ट होतील. 

About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News