“जयदेवी जयदेवी जय लक्ष्मीमाता।” ही महालक्ष्मी देवीची आरती आहे, जी खास करून मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारच्या पूजेमध्ये म्हंटली जाते. या महिन्यातील गुरुवार हे लक्ष्मीचे व्रत करण्यासाठी महत्त्वाचे मानले जातात, ज्यामध्ये देवीला प्रसन्न करून सुख-समृद्धी आणि समृद्धीची प्रार्थना केली जाते.
मार्गशीर्ष गुरुवारचे महत्व
मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार लक्ष्मी देवीला समर्पित आहे, ज्याला ‘मार्गशीर्ष गुरुवार’ म्हणतात. या काळात श्री लक्ष्मीची आरती करणे, मंत्र जपणे आणि व्रत ठेवणे शुभ मानले जाते, कारण या महिन्यात लक्ष्मी माता विशेष कृपा करते. हा महिना लक्ष्मी देवीला अत्यंत प्रिय आहे आणि या महिन्यात तिची आराधना केल्याने घरात सुख-समृद्धी येते. अनेक जण मार्गशीर्ष महिन्यात पहिल्या गुरुवारी व्रत सुरू करतात आणि शेवटच्या गुरुवारी त्याचे उद्यापन करतात.

श्री महालक्ष्मी देवीची आरती
जयदेवी जयदेवी जय लक्ष्मीमाता।
प्रसन्न होऊनिया वर देई आता।। धृ. ।।
विष्णुप्रिये तुझी सर्वांतरी सत्ता।
धन दौलत देई लक्ष्मीव्रत करिता।।1।।
विश्वव्यापक जननी तुज ऐसी नाही।
धावसी आम्हालाही पावसी लवलाही।। 2।।
त्र्यैलोक्य धारिणी तू भक्ता लाभे सुखशांती।
सर्व सर्वही दु:ख सर्व ती पळती ।।3।।
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)











