Soham Bandekar Wedding : बांदेकरांच्या लेकाचं डेस्टिनेशन विडींग! सोहम–पूजा आज विवाहबंधनात अडकणार

दोघांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केलाय. पूजाने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती तर सोहमने आकर्षक डिझाईन असलेला कुर्ता घातला होता

Soham Bandekar Wedding : मराठी मनोरंजन क्षेत्रातील लोकप्रिय चेहरे आदेश आणि सुचित्रा बांदेकर यांचा लेक सोहमचा आज विवाहसोहळा संपन्न झाला.खर तर या लग्नाची सोशल मीडियावर गेली काही दिवसांपासून जोरदार चर्चा रंगत होती. विवाहापूर्वीपासूनच मेहंदी, हळद आणि संगीत यांचे फोटो व व्हिडीओ चाहत्यांच्या टाइमलाइनवर दिसू लागले होते. आता या दोघांचा ग्रँड लग्नसोहळा लोणावळ्यात पार पडला असून, मराठी कलाविश्वातील अनेक दिग्गजांनी या नवदांपत्यावर प्रेमाचा वर्षाव करण्यासाठी येथे हजेरी लावली आहे.

मुंबई नव्हे, लोणावळ्याची निवड (Soham Bandekar Wedding)

सोहम आणि पूजाने आपल्या लग्नासाठी महानगरातील गजबज टाळून निसर्गरम्य लोणावळ्याची निवड केली आहे. या डेस्टिनेशन वेडिंगसाठी दोन्ही परिवारांसह मराठी मालिकांच्या शूटिंगमधून वेळ काढत अनेक कलाकार लोणावळ्यात दाखल झाले आहेत. लग्नसोहळ्याच्या इनसाइड व्हिडिओंमध्ये सचित पाटील, अभिजीत केळकर, ऋजुता देशमुख, अजित परब, सुमीत राघवन, दिपाली विचारे, सानिका बनारसवाले, सुकन्या मोने यांसारख्या कलाकारांची उपस्थिती चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.  (Soham Bandekar Wedding)

आदेश आणि सुचित्रा बांदेकर पाहुण्यांचे अत्यंत आपुलकीने स्वागत केले. या लग्न सोहळ्याला मोठी गर्दी बघायला मिळाली. दोघांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होताच चाहत्यांनी अभिनंदनाचा वर्षाव केलाय. पूजाने गुलाबी रंगाची साडी परिधान केली होती तर सोहमने आकर्षक डिझाईन असलेला कुर्ता घातला होता. सोहम सध्या ‘घरोघरी मातीच्या चुली’ आणि ‘ठरलं तर मग’ या मालिकांचा निर्माता म्हणून काम पाहत आहे. दुसरीकडे, पूजा बिरारी ‘येड लागलं प्रेमाचं’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे.

मालिका–चित्रपट क्षेत्रातून मोठा प्रतिसाद

सुट्टीच्या वातावरणात शनिवारपासून लग्नाच्या विधींना सुरुवात झाली. पूजाने मेहंदी सोहळ्यातील सुंदर फोटो शेअर करत सोहमसाठी एक खास पोस्टही लिहिली होती. यानंतर 1 डिसेंबरला सकाळी हळदीचा रंगतदार समारंभ झाला. हळदीनंतर रात्री दोघांनी संगीत सोहळ्यात स्टेजवर धमाल केली. व्हाइट कलरमध्ये केलेल्या त्याच्या ट्विनिंग आउटफिटने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News