कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या नवमीला साजरा केला जाणारा सण म्हणजे अक्षय नवमी (Akshaya Navami 2025)….अक्षय नवमी हा दिवस धार्मिकता, सत्य आणि शाश्वत समृद्धीचे प्रतीक मानला जातो.या दिवशी आवळ्याच्या झाडाची पूजा केली जाते आणि या शुभ मुहूर्तावर दानधर्म केल्याने अनंत फळे मिळतात असे मानले जाते. या दिवशी केलेल्या चांगल्या कामांचे फळ कधीही कमी होत नाही. या दिवशी भगवान विष्णू आवळ्याच्या झाडावर वास्तव्य करत होते.
अक्षय नवमीला केलेल्या प्रत्येक शुभ कृतीला अक्षय मानले जाते, म्हणजेच त्यात कधीही न संपणारी फलप्राप्ती असते. ही तिथी केवळ उपवास आणि पूजा करण्यासाठीच नाही तर वस्तू खरेदी करण्यासाठी देखील अत्यंत शुभ आहे. असे मानले जाते की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तू घरात शाश्वत समृद्धी आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आणतात. परंतु अक्षय नवमीच्या दिवशी काही वस्तूंची खरेदी टाळणे ही तितकंच आवश्यक असते अन्यथा तुमच्या आयुष्यात अडचणी आणि संकट येऊ शकतात अशावेळी अक्षय नवमीला काय खरेदी करावे आणि काय टाळावे ते पाहूया.

अक्षय नवमीला काय खरेदी करावे – Akshaya Navami 2025
अक्षय नवमीच्या शुभ मुहूर्तावर सोने, चांदी, तांबे किंवा पितळ यासारख्या शुभ धातूंची खरेदी करणे शुभ मानले जाते. तसेच आवळ्याचे रोप लावणे किंवा आवळ्याच्या झाडाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. याशिवाय दिवे, पूजा भांडी, कलश आणि तुळशी यासारख्या धार्मिक वस्तू खरेदी करणे शुभ परिणाम देते. हा दिवस संयम, भक्ती आणि चांगल्या कर्मांद्वारे चिरस्थायी समृद्धी प्राप्त करण्याचे प्रतीक आहे.
अक्षय नवमीला काय खरेदी करू नये –
अक्षय नवमीच्या दिवशी फॅशनेबल दागिने किंवा महागडे कपडे यासारख्या दिखाऊ किंवा लक्झरी वस्तू खरेदी करणे टाळा. महत्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी एखादी वस्तू उधारीवर घेणेही टाळले पाहिजे. तसेच अनावश्यक खर्च टाळण्याचा प्रयत्न करा.
(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही.)











