MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

शिवलिंगावर आधी काय अर्पण करावं? बेलपत्र की पाणी, जाणून घ्या पूजेची योग्य पद्धत

शिवलिंगावर जल आणि बेलपत्र दोन्ही अर्पण करणे महत्वाचे आहे, परंतु सामान्यतः जल प्रथम अर्पण केले जाते. यानंतर बेलपत्र अर्पण करावे.

शिवलिंगाची पूजा केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात. शिवलिंगावर विविध गोष्टी अर्पण केल्या जातात. पण तुम्हाला हे माहिती आहे का शिवलिंगावर सर्वांत आधी काय अपर्ण करावे? पूजेच्या नियमांनुसार कोणत्या क्रमाने कोणत्या गोष्ट अर्पण कराव्यात? जाणून घेऊ शिवलिंगाच्या पूजेचे नियम…

पूजेची योग्य पद्धत

जलाभिषेक

  • सर्वात आधी, शिवलिंगावर जल अर्पण करा. पवित्र पाण्याने (गंगाजल किंवा साधे पाणी) शिवलिंगाचा अभिषेक करावा.
  • हे पाणी शिवलिंगावरुन हळूवारपणे खाली येऊ द्यावे.
  • जलाभिषेक करताना ॐ नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.

बेलपत्र अर्पण

  • जलाभिषेक केल्यानंतर, बेलपत्र अर्पण करा.
  • बेलपत्र नेहमी स्वच्छ आणि ताजी असावी.
  • बेलपत्राची3 पाने एकत्र जोडून ती शिवलिंगावर अर्पण करावी.
  • बेलपत्र अर्पण करताना, ते योग्य दिशेने ठेवावे, म्हणजे पानांचा पृष्ठभाग शिवलिंगाला स्पर्श करेल.
  • बेलपत्र अर्पण करताना, ‘ॐ नमः शिवाय’ किंवा ‘श्री शिवाय नमस्तुभ्यं’ या मंत्राचा जप करावा. 

पूजेची योग्य पद्धत काय?

  • सर्वप्रथम, शिवलिंगावर शुद्ध पाणी (किंवा गंगाजल) अर्पण करून जलाभिषेक करावा.
  • त्यानंतर, दूध, दही, मध, साखर आणि तुपाने तयार केलेले पंचामृत शिवलिंगावर अर्पण करावे.
  • जलाभिषेक आणि पंचामृताभिषेक झाल्यानंतर, बेलपत्र अर्पण करावे.
  • यानंतर, धोतरा, भांग, आणि इतर नैवेद्य अर्पण करावेत.
  • पूजेदरम्यान, ‘ॐ नमः शिवाय’ किंवा इतर शिव मंत्रांचा जप करावा.
  • पूजेनंतर आरती करावी.

शिवलिंगावर आधी जल का अर्पण करावे?

शिवलिंगावर आधी जल अर्पण करण्याचे धार्मिक आणि वैज्ञानिक महत्त्व आहे. धार्मिक दृष्ट्या, जलाभिषेक केल्याने भगवान शंकर प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात. वैज्ञानिक दृष्ट्या, जल हे शुद्धतेचे प्रतीक आहे आणि ते शिवलिंगाला अर्पण केल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. पौराणिक कथेनुसार, समुद्रमंथनाच्या वेळी निघालेले विष भगवान शंकराने जगाच्या कल्याणासाठी प्राशन केले होते. त्यावेळी त्या विषाच्या दाहकतेमुळे त्यांना खूप त्रास होत होता, आणि तो त्रास कमी करण्यासाठी त्यांच्या मस्तकावर सतत जल अर्पण केले जात होते. त्यामुळे, शिवलिंगावर जल अर्पण करणे, हे शिवाला शांती आणि शीतलता प्रदान करण्याचे प्रतीक मानले जाते. 

बेलपत्राचं महत्त्व काय?

बेलपत्राला धार्मिक आणि आरोग्यविषयक महत्त्व आहे. शंकराच्या पूजेमध्ये याला विशेष स्थान आहे, तसेच ते आरोग्यासाठीही गुणकारी मानले जाते. बेलपत्र हे भगवान शंकराला अत्यंत प्रिय आहे. श्रावण महिन्यात बेलपत्र अर्पण करणे शुभ मानले जाते.  बेलपत्राची तीन पाने शंकराच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत. यामुळे महादेव प्रसन्न होतात आणि भक्तांच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी मान्यता आहे. 

(टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.)