Dev Uthani Ekadashi 2025 : एकादशीला बनवा साबुदाणा खिचडी, 15 मिनिटांत होणारी सोप्पी रेसिपी वाचा…

Asavari Khedekar Burumbadkar

उपवास म्हंटल कि आपल्या प्रत्येकाच्या घरात साबुदाणा खिचडी बनवलेली असते. त्यात साबुदाणा खिचडी ही आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीची आवडीची डिश आहे. लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सगळ्यांना साबुदाणा खिचडी आवडते. चला तर मग जाणून घेऊया साबुदाणा खिचडी कशी बनवायची…

साहित्य

  • 1 टीस्पून तूप
  • 1/2 टीस्पून जिरे
  • चिरलेली हिरवी मिरची
  • उकडलेले आणि सोललेले बटाटे
  • भिजवलेला साबुदाणा
  • शेंगदाणा कूट
  • चवीनुसार मीठ
  • बारीक चिरलेली कोथिंबीर

कृती

  • साबुदाणा रात्रभर पाण्यात भिजत ठेवा. तो जास्त चिकट होऊ नये म्हणून पाणी जपून घाला.
  • एका कढईत तूप किंवा तेल गरम करा. त्यात जिरे, हिरवी मिरची आणि उकडलेले बटाट्याचे तुकडे घालून एक-दोन मिनिटे परतून घ्या.
  • त्यानंतर भिजवलेला साबुदाणा, शेंगदाण्याचा कूट, चवीनुसार मीठ आणि साखर एकत्र करा. कोथिंबीर घाला आणि चांगले मिसळा. साबुदाणा खिचडी तयार आहे.
  • गरमागरम खिचडीवर कोथिंबीर किंवा लिंबाचा रस घालून सर्व्ह करा. 

ताज्या बातम्या