‘तारक’ म्हणजे तारणारा आणि मंत्र संकटातून वाचवतो, त्यामुळे या मंत्राला स्वामी समर्थ तारक मंत्र म्हणतात कारण ते भक्तांच्या हाकेला धावून जातात. हा मंत्र ताणतणाव कमी करण्यास आणि आत्म-शुद्धी करण्यास मदत करतो.
तारक मंत्राचे फायदे
- मंत्राच्या जपाने मानसिक शांती मिळते आणि ताणतणाव कमी होतो.
- नियमित जप केल्याने आरोग्य सुधारते आणि राग कमी होतो.
- मंत्रजप केल्याने जीवनात यश मिळते, असे म्हटले जाते. जीवनात येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि यश मिळवण्यासाठी हा मंत्र उपयुक्त ठरतो.
तारक मंत्र जपण्याची पद्धत
- पहाटे ब्रह्ममुहूर्तावर जप करणे सर्वोत्तम मानले जाते. सकाळी लवकर उठून जप करावा.
- दररोज ११ वेळा जप करणे उत्तम आहे, परंतु ते शक्य नसल्यास दिवसातून किमान तीन वेळा जप करावा. सकाळी देवपूजेनंतर आणि संध्याकाळी दिवे लागणीला जप करणे सर्वोत्तम मानले जाते.
श्री स्वामी समर्थ तारक मंत्र
नि:शंक हो निर्भय हो मना रे।
प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ।।
अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी ।
अशक्यही शक्य करतील स्वामी ।।१।।
जिथे स्वामिपाय तिथे न्यून काय ।
स्वये भक्त – प्रारब्ध घडवी हि माय ।।
आज्ञेविणा ना काळ ना नेई त्याला ।
परलोकीही ना भीती त्याला ।।२।।
उगाची भितोसी भय हें पळू दे ।
जवळी उभी स्वामीशक्ती कळू दे ।
जगी जन्ममृत्यू असे खेळ ज्यांचा ।
नको घाबरू । तू असे बाळ त्यांचा ।।३।।
खरा होई जागा । श्रद्धेसहीत ।
कसा होशी त्याविन तू स्वामीभक्त ।।
कितीदा दिला बोल त्यांनीच हात ।
नको डगमगू । स्वामी देतील साथ ।।४।।
विभूती नमन नाम ध्यानादी तीर्थ ।
स्वामीच या पंच प्राणामृतात ।।
हे तीर्थ घे आठवी रे प्रचीति ।
न सोडी कदा स्वामी ज्या घेई हाती ।।५।।
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)
