सिताफळाची रबडी ही महाराष्ट्रातील पारंपरिक रबडीची एक खास डिश आहे, जी सण, समारंभ किंवा पाहुणचारासाठी उत्तम पर्याय ठरते. थंडगार सर्व्ह केल्यावर ही रबडी प्रत्येकाच्या जिभेवरची लज्जतदार मेजवानी ठरते. आता दिवाळीच्या निमित्ताने घरी येणाऱ्या पाहुण्यांना ही रबडी देऊन तुम्ही त्यांना खुश करू शकता. चला याची सोपी रेसिपी जाणून घेऊयात…
साहित्य
- १ लिटर फुल फॅट दूध
- ½ कप साखर (चवीनुसार कमी-जास्त)
- ४–५ वेलची पूड
- थोडे बदाम-पिस्ते (सजावटीसाठी चिरलेले)
- २ मोठे पिकलेले सिताफळ (फळाची गर वेगळी करून बिया काढलेल्या)
कृती
- प्रथम दूध जाड बुडाच्या पातेल्यात उकळायला ठेवा.
- दूध उकळले की मंद आचेवर ३०–३५ मिनिटे सतत हालवत घट्ट करून घ्या.
- दुधात घट्टसरपणा आल्यावर ते रबडीसारखे होईल.
- आता त्यात साखर घालून नीट मिसळा.
- वेलची पूड व थोडे चिरलेले बदाम-पिस्ते टाका.
- गॅस बंद करून पूर्णपणे थंड होऊ द्या.
- आता सिताफळाचा गर (बिया काढून) थंड झालेल्या रबडीत घालून हलक्या हाताने मिसळा.
- तयार रबडी कमीत कमी १ तास फ्रीजमध्ये थंड करा.
- रबडी थंड झाल्यावर वरून ड्राय फ्रुट्स घालून सर्व्ह करा.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)












