हिंदू कॅलेंडरनुसार, कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला कार्तिकी एकादशी म्हणतात. या एकादशीला प्रबोधिनी एकादशी किंवा देवउठणी एकादशी असेही म्हणतात. या दिवशी चातुर्मास संपतो. या तिथीला भगवान श्री हरी विष्णू चार महिन्यांच्या योगनिद्रातून बाहेर पडतात. कार्तिकी एकादशीपासून मांगलिक कार्याला सुरुवात होते. आपल्याकडे लोक खूप भक्तिभावाने प्रत्येक एकादशीचा उपवास करतात. प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केली जाते. या दिवशी तुळशी विवाह ही केला जातो. जाणून घ्या प्रबोधिनी एकादशीच्या दिवशी काय करू नये….
देवउठनी एकादशीच्या दिवशी ‘या’ गोष्टी करु नका
मद्यपान आणि मांसाहार टाळावा
देवउठनी एकादशीच्या दिवशी मद्यपान, मांसाहारी पदार्थ, कांदा, लसूण यांचं सेवन करु नये. एकादशीच्या दिवशी धुम्रपान किंवा तंबाखूचे सेवन करू नये. या दिवशी फळे (सफरचंद, केळी इ.), दूध, साबुदाणा, आणि सैंधव मीठ वापरून बनवलेले पदार्थ खाऊ शकता. या दिवशी सात्विक आणि हलके अन्न खावे, तामसिक गोष्टी टाळाव्यात.

तुळशीची पानं तोडू नयेत
देवउठनी एकादशीच्या दिवशी किंवा अन्य एकादशीच्या दिवशी तुळशीची पानं तोडू नयेत. कारण हे अशुभ मानलं जातं. तुम्ही एकादशीच्या एक दिवसाआधी तुळशीची पानं तोडू शकता. हा दिवस तुळशी आणि शाळीग्राम यांच्या विवासाचा असल्याने, या दिवशी तुळशीची पाने तोडणे वर्ज्य मानले जाते.
एकादशीच्या दिवशी केस धुवू नका
देवउठनी एकादशीच्या एक दिवसाआधी केस धुवून घ्या. एकादशीच्या दिवशी केस धुवू नका. कार्तिकी एकादशीला केस धुणे टाळावे.
खोटं बोलू नये
एकादशीच्या दिवशी भक्तांनी निद्रा करु नये. विशेषत: जे उपवास करतायत त्यांनी झोपूनये. तसेच. या दिवशी खोटं बोलू नये. अपमानकारक भाषेचा वापर करु नये. कार्तिकी एकादशीला निद्रा, भांडण, खोटे बोलणे, तामसिक भोजन आणि ज्येष्ठांचा किंवा स्त्रियांचा अपमान करणे टाळावे. या दिवशी केस कापणे, नखे कापणे देखील टाळावे.
(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking कोणताही दावा करत नाही.)