Kartiki Ekadashi 2025 : कार्तिकी एकादशीनिमित्त उपवासाला करा शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू

Asavari Khedekar Burumbadkar

कार्तिक महिना आला की कार्तिकी एकादशीची ओढ लागते. एकादशीनिमित्त अनेक जण उपवास देखील करतात. दिवसभर काही न खाता-पीता श्रद्धेने एकादशीचा उपवास केला जातो. कार्तिकी एकादशीनिमित्त आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू. चला तर जाणून घेऊया शेंगदाण्याचे पौष्टिक लाडू बनवण्याची सोपी रेसिपी

साहित्य

  • शेंगदाणे (शेंगदाण्याची डाळ)
  • गूळ
  • तूप

कृती

  • शेंगदाणे मंद आचेवर चांगले खरपूस भाजून घ्या.
  • शेंगदाणे थोडे थंड झाल्यावर त्यांची साल काढून टाका.
  • शेंगदाण्याची डाळ मिक्सरमधून फिरवून थोडी जाडसर पावडर बनवा. एकदम बारीक पीठ करू नका.
  • कढईत शेंगदाण्याच्या जाडसर पावडरमध्ये गूळ घालून मंद आचेवर मिक्स करा.
  • गूळ विरघळायला लागल्यावर त्यात तूप घाला आणि मिश्रण एकजीव होईपर्यंत शिजवा.
  • मिश्रण थोडे कोमट झाल्यावर हाताला तूप लावून त्याचे लाडू वळा.
  • लाडू थंड झाल्यावर घट्ट होतील. 

ताज्या बातम्या