Dev Uthani Ekadashi 2025 : उपवास विशेष चविष्ट व पौष्टिक राजगिरा खीर, पाहा सोपी रेसिपी

Asavari Khedekar Burumbadkar

उपवासाच्या दिवशी आहारात मोजक्याच पदार्थांचे सेवन केले जाते. साबुदाण्याची खिचडी, साबुदाणा वडा किंवा वरीच्या तांदळाचा भात आणि शेंगदाण्याची आमटी बनवून खाल्ली जाते. मात्र नेहमीच तेच ठराविक पदार्थ खाऊन कंटाळा आल्यानंतर तुम्ही सोप्या पद्धतीमध्ये राजगिऱ्यापासून पौष्टिक खीर बनवू शकता. चला तर जाणून घेऊया राजगिऱ्यापासून पौष्टिक खीर बनवण्याची सोपी रेसिपी…

साहित्य

  • १/२ कप राजगिरा (फुगवलेला किंवा साधे दाणे)
  • २ कप दूध
  • ४-५ चमचे साखर किंवा गूळ (चवीनुसार)
  • सुका मेवा (बदाम, काजू, बेदाणे) आणि वेलची पूड (चवीनुसार) 

कृती

  • एका भांड्यात दूध गरम करायला ठेवा.
  • दुधाला उकळी आल्यावर त्यात राजगिरा टाका.
  • राजगिरा दुधात चांगला शिजवा. जर तुम्ही फुगवलेला राजगिरा वापरत असाल, तर तो मंद आचेवर २-३ मिनिटे शिजवा. जर साधे दाणे वापरत असाल, तर ते मऊ होईपर्यंत शिजवा.
  • त्यात साखर किंवा गूळ घाला आणि तो पूर्णपणे विरघळेपर्यंत ढवळा.
  • ड्राय फ्रुट्स आणि वेलची पूड घालून मिक्स करा.
  • गरमागरम किंवा थंडगार सर्व्ह करा. 

ताज्या बातम्या