दिवाळी झाल्यानंतर सगळ्यांना वेध लागतात ते तुळशीच्या लग्नाचे. तुळशीचे लग्न अगदी थाटामाटात पार पडल्यानंतर अनेक शुभ कार्याला सुरुवात होते. तुळशी विवाहापूर्वी देवउठणी एकादशीचे व्रत केले जाते. या दिवशी भगवान विष्णू निद्रावस्थेतून जागे होतात आणि चातुर्मासाची समाप्ती होते. कार्तिक शुद्ध द्वादशीपासून ते कार्तिक पौर्णिमेपर्यंत तुळशीचा विवाह केला जातो. तुळशी नामाष्टक स्तोत्र आणि महत्व जाणून घ्या…
श्री तुळशी नामाष्टक स्तोत्राचे महत्त्व
श्री तुळशी नामाष्टकाचा जप केल्याने अश्वमेध यज्ञाचे फळ मिळते. हे स्तोत्र तुळशी देवीची आठ नावे सांगते: वृंदा, वृंदावनी, विश्वपूजिता, विश्वपावनी, पुष्पसारा, नंदिनी, तुळशी आणि कृष्णजीवनी. या नामाष्टकाचा पाठ तुळशीच्या पूजेसोबत केल्याने घरात सुख-समृद्धी येते आणि धनलाभाचे योग जुळून येतात. या स्तोत्राचा जप केल्याने सुख-समृद्धी मिळते, असे मानले जाते. यामुळे तुळशीची पूजा करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते, कारण त्यात सर्व देवतांचा वास असतो. या स्तोत्राचा जप केल्याने पापांचा नाश होतो. तुळशीला भगवान विष्णूचे निवासस्थान मानले जाते. त्यामुळे तुळशीची पूजा आणि नामाष्टकाचा जप केल्याने मोक्षप्राप्तीचा मार्ग सुकर होतो.

श्री तुळशी नामाष्टकाचा पाठ कसा करावा
- तुळशीची पूजा करून त्यानंतर या नामाष्टकाचा पाठ करावा.
- रोज तुळशीसमोर बसून या मंत्राचा किंवा नामाष्टकाचा जप करावा.
- तुळशीला नैवेद्य अर्पण करतानाही या स्तोत्राचा जप करू शकता.











